< गीतरत्न 1 >

1 हे शलमोनाचे गीतरत्न आहे:
これはソロモンの雅歌なり
2 (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलत आहे) तू माझे मुखचुंबन घे, कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा उत्तम आहे.
ねがはしきは彼その口の接吻をもて我にくちつけせんことなり 汝の愛は酒よりもまさりぬ
3 तुझ्या अभिषेकाच्या तेलाचा सुगंध मोहक आहे, तुझे नाव दरवळणाऱ्या सुवासासारखे आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात.
なんぢの香膏は其香味たへに馨しくなんぢの名はそそがれたる香膏のごとし 是をもて女子等なんぢを愛す
4 मला तुझ्याबरोबर ने आणि आपण पळून जाऊ. (तरुणी स्वतःशीच बोलते) राजाने मला त्याच्या अंतःपुरात आणले आहे. (तरुणी तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) मी आनंदीत आहे. मी तुझ्याविषयी आनंदीत आहे. मला तुझे प्रेम साजरे करू दे. ते द्राक्षरसापेक्षा चांगले आहे.
われを引き給へ われら汝にしたがひて走らん 王われをたづさへてその後宮にいれたまへり 我らは汝によりて歡び樂しみ酒よりも勝りてなんぢの愛をほめたたふ 彼らは直きこころをもて汝を愛す
5 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते) अहो, यरूशलेमेच्या कन्यांनो, मी काळीसावळी पण सुंदर आहे. मी केदारच्या तंबूसारखी काळी आणि शलमोनाच्या पडद्यासारखी सुंदर आहे.
エルサレムの女子等よ われは黒けれどもなほ美はし ケダルの天幕のごとく またソロモンの帷帳に似たり
6 मी काळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका. कारण सूर्याने मी होरपळले आहे. माझे स्वतःचे भाऊ माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला द्राक्षांच्या मळ्याची राखण करण्यास ठेवले. परंतु मी आपल्या स्वत: च्या द्राक्षमळ्याची काळजी घेतली नाही.
われ色くろきが故に日のわれを焼たるが故に我を視るなかれ わが母の子等われを怒りて我に葡萄園をまもらしめたり 我はおのが葡萄園をまもらざりき
7 (ती स्त्री तिच्या प्रियकराबरोबर बोलत आहे) माझ्या जीवाच्या प्रियकरा, मला सांग: तो तू तुझा कळप कोठे चारतोस? तू तुझ्या कळपाला दुपारी कोठे विसावा देतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपाजवळ भटकणाऱ्यांसारखी मी का व्हावे?
わが心の愛する者よなんぢは何處にてなんぢの群を牧ひ 午時いづこにて之を息まするや請ふわれに告げよ なんぞ面を覆へる者の如くしてなんぢが伴侶の群のかたはらにをるべけんや
8 (तिचा प्रियकर तिला उत्तर देतो) हे परम सुंदरी, जर तुला काय करायचे ते माहीत नाही तर माझ्या कळपाच्या मागे जा. तुझ्या लहान बकऱ्यांना मेंढपाळाच्या तंबूजवळच्या कुरणात चार.
婦女の最も美はしき者よ なんぢ若しらずば群の足跡にしたがひて出ゆき 牧羊者の天幕のかたはらにて汝の羔山羊を牧へ
9 माझ्या प्रिये, फारोच्या रथाच्या घोड्यांतल्या एका घोडीशी मी तुझी तुलना करतो.
わが佳耦よ 我なんぢをパロの車の馬に譬ふ
10 १० तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.
なんぢの臉には鏈索を垂れ なんぢの頸には珠玉を陳ねて至も美はし われら白銀の星をつけたる黄金の鏈索をなんぢのために造らん
11 ११ मी तुझ्यासाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे दागिने करेन.
12 १२ (ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
王其席につきたまふ時 わがナルダ其香味をいだせり
13 १३ माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला, माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
わが愛する者は我にとりてはわが胸のあひだにおきたる沒藥の袋のごとし
14 १४ माझा प्रियकर एन-गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.
わが愛する者はわれにとりてはエンゲデの園にあるコペルの英華のごとし
15 १५ (तिचा प्रियकर तिच्याशी बोलतो) पाहा माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत.
ああ美はしきかな わが佳耦よ ああうるはしきかな なんぢの目は鴿のごとし
16 १६ (तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
わが愛する者よ ああなんぢは美はしくまた樂しきかな われらの牀は青緑なり
17 १७ आपल्या घराच्या तुळ्या गंधसरूच्या लाकडाच्या आहेत. आणि छताचे वासे देवदारुच्या लाकडाचे आहे.
われらの家の棟梁は香柏 その垂木は松の木なり

< गीतरत्न 1 >