< रूथ 4 >

1 आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.
بوعز به دروازهٔ شهر که محل اجتماع مردم شهر بود رفت و در آنجا نشست. آنگاه آن مرد که نزدیکترین خویشاوند شوهر نعومی بود به آنجا آمد. بوعز او را صدا زده گفت: «بیا اینجا! می‌خواهم چند کلمه‌ای با تو صحبت کنم.» او آمد و نزد بوعز نشست.
2 मग गावातील दहा वडील जनांना बोलावून तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा” आणि तेसुध्दा बसले.
آنگاه بوعز ده نفر از ریش‌سفیدان شهر را دعوت کرد تا شاهد باشند.
3 मग तो त्या जवळच्या नातलगाला म्हणाला, “मवाब देशातून नामी आली आहे; ती तुझा माझा बंधू अलीमलेख याच्या शेताचा भाग विकत आहे,
بوعز به خویشاوند خود گفت: «تو می‌دانی که نعومی از سرزمین موآب برگشته است. او در نظر دارد ملک برادرمان الیملک را بفروشد.
4 आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
فکر کردم بهتر است در این باره با تو صحبت کنم تا اگر مایل باشی، در حضور این جمع آن را خریداری نمایی. اگر خریدار آن هستی همین حالا بگو. در غیر این صورت خودم آن را می‌خرم. اما تو بر من مقدم هستی و بعد از تو حق من است که آن ملک را خریداری نمایم.» آن مرد جواب داد: «بسیار خوب، من آن را می‌خرم.»
5 मग बवाज म्हणाला, “ज्या दिवशी ते शेत नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची पत्नी मवाबी रूथ हिच्याकडूनही तुला ते विकत घ्यावे लागेल, ते अशासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनाला चालावे.”
بوعز به او گفت: «تو که زمین را می‌خری موظف هستی با روت نیز ازدواج کنی تا بچه‌دار شود و فرزندانش وارث آن زمین گردند و به این وسیله نام شوهرش زنده بماند.»
6 तेव्हा तो जवळचा नातलग म्हणाला, “माझ्याच्याने ते वतन खंडणी भरून सोडवता येत नाही; सोडवले तर माझ्या वतनाचे माझ्याकडून नुकसान होईल, म्हणून माझा खंडून घेण्याचा अधिकार तू घे.”
آن مرد گفت: «در این صورت من از حق خرید زمین می‌گذرم، زیرا فرزند روت وارث ملک من نیز خواهد بود. تو آن را خریداری کن.»
7 वतन खंडणी भरून सोडविण्याची व त्याची अदलाबदल करून करार पक्के करण्याची पूर्वी इस्राएलात अशी पद्धत होती की मनुष्य आपल्या चपला काढून दुसऱ्याला देत असे.
(در آن روزگار در اسرائیل مرسوم بود که هرگاه شخصی می‌خواست حق خرید ملکی را به دیگری واگذار کند، کفشش را از پا درمی‌آورد و به او می‌داد. این عمل، معامله را در نظر مردم معتبر می‌ساخت.)
8 तो जवळचा नातलग बवाजाला म्हणाला, “तूच ते विकत घे,” आणि असे म्हणून त्याने आपल्या चपला काढल्या.
پس آن مرد وقتی به بوعز گفت: «تو آن زمین را خریداری کن»، کفشش را از پا درآورد و به او داد.
9 बवाज त्या वडीलजनांना व सर्व लोकांस म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्लोन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे.
آنگاه بوعز به ریش‌سفیدان محل و مردمی که در آنجا ایستاده بودند گفت: «شما شاهد باشید که امروز من تمام املاک الیملک، کلیون و محلون را از نعومی خریدم.
10 १० याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून मी तिचा स्वीकार करतो; ते यासाठी की मृताचे नाव त्याच्या वतनात कायम रहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये, आज तुम्ही याविषयी साक्षी आहात.”
در ضمن با روت موآبی، زن بیوهٔ محلون ازدواج خواهم کرد تا او پسری بیاورد که وارث شوهر مرحومش گردد و به این وسیله نام او در خاندان و در زادگاهش زنده بماند.»
11 ११ तेव्हा वेशीतील सर्व लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहो, ही जी स्त्री तुझ्या घरी येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल आणि लेआ ह्यांच्याप्रमाणे करो; एफ्राथा येथे भरभराट आणि बेथलहेमात कीर्ती होवो.
همهٔ مشایخ و مردمی که در آنجا بودند گفتند: «ما شاهد بر این معامله هستیم. خداوند این زنی را که به خانهٔ تو خواهد آمد، مانند راحیل و لیه بسازد که با هم دودمان اسرائیل را بنا کردند. باشد که تو در افراته و بیت‌لحم معروف و کامیاب شوی.
12 १२ आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्याद्वारे होवो.”
با فرزندانی که خداوند به وسیلۀ این زن به تو می‌بخشد، خاندان تو مانند خاندان فارَص پسر تامار و یهودا باشد.»
13 १३ मग बवाजाने रूथशी लग्न केले व ती त्याची पत्नी झाली. तो तिच्यापाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला.
پس بوعز با روت ازدواج کرد و خداوند به آنها پسری بخشید.
14 १४ तेव्हा तेथील स्त्रिया नामीला म्हणाल्या, “परमेश्वर धन्यवादित असो, कारण त्याने तुला जवळच्या नातलगाशिवाय राहू दिले नाही, त्याचे नाव इस्राएलात प्रसिद्ध होवो.
زنان شهر بیت‌لحم به نعومی گفتند: «سپاس بر خداوند که تو را بی‌سرپرست نگذاشت و نوه‌ای به تو بخشید. باشد که او در اسرائیل معروف شود.
15 १५ तो तुला पुन्हा जीवन देणारा व वृद्धापकाळी सांभाळणारा असा होईल, कारण जी सून तुझ्यावर प्रीती करते, जी सात मुलांपेक्षा तुला अधिक आहे, तिला तो झाला आहे.”
عروست که تو را دوست می‌دارد و برای تو از هفت پسر بهتر بوده، پسری به دنیا آورده است. این پسر جان تو را تازه خواهد کرد و در هنگام پیری از تو مراقبت خواهد نمود.»
16 १६ तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.
نعومی نوزاد را در آغوش گرفت و دایهٔ او شد.
17 १७ “नामीला पुत्र झाला” असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद ठेवले. तो इशायाचा पिता व दावीदाचा आजोबा झाला.
زنان همسایه آن نوزاد را عوبید نامیده گفتند: «پسری برای نعومی متولد شد!» (عوبید پدر یَسا و پدر بزرگ داوود پادشاه است.)
18 १८ पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,
این است نسب نامهٔ بوعز که از فارص شروع شده، به داوود ختم می‌شود: فارص، حصرون، رام، عمیناداب، نحشون، سلمون، بوعز، عوبید، یَسا و داوود.
19 १९ हेस्रोन रामचा पिता झाला, राम अम्मीनादाबाचा पिता झाला,
20 २० अम्मीनादाब नहशोनाचा पिता झाला, नहशोन सल्मोनाचा पिता झाला,
21 २१ सल्मोन बवाजाचा पिता झाला, बवाज ओबेदाचा पिता झाला,
22 २२ ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.

< रूथ 4 >