< रूथ 2 >
1 १ नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते.
Naomí je imela sorodnika svojega soproga, mogočnega človeka premoženja, iz Elimélehove družine. Njegovo ime je bilo Boaz.
2 २ मवाबी रूथ नामीला म्हणाली, “मला शेतात जाऊ द्या, म्हणजे ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल त्याच्यामागे मी धान्याचा सरवा वेचीत जाईन.” तेव्हा तिने म्हटले, “माझ्या मुली, जा.”
Moábka Ruta je rekla Naomí: »Naj grem torej na polje in paberkujem žitno klasje za tistim, v čigar očeh bom našla milost.« In rekla ji je: »Pojdi, moja hči.«
3 ३ मग ती निघून शेतात गेली आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे धान्य वेचू लागली, तेव्हा असे झाले की, शेताच्या ज्या भागात ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातला बवाज याचा होता.
Odšla je in prišla ter za žanjci paberkovala na polju in sreča se ji je posvetila na delu polja, ki je pripadal Boazu, ki je bil Elimélehov sorodnik.
4 ४ आणि पाहा, बवाज बेथलेहेम गावातून शेतात परत आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यांना म्हणाला, “परमेश्वर तुम्हाबरोबर असो,” आणि त्यांनी उत्तर दिले “परमेश्वर तुला आशीर्वादित करो.”
Glej, Boaz je prišel iz Betlehema in rekel žanjcem: » Gospod naj bo z vami.« Odgovorili so mu: » Gospod te blagoslovi.«
5 ५ मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या देखरेख करणाऱ्या दासास म्हणाला, “ही तरुण स्त्री कोण आहे?”
Potem je Boaz rekel svojemu služabniku, ki je bil postavljen nad žanjce: »Čigava gospodična je to?«
6 ६ कापणी करणाऱ्यांवर देखरेख करणाऱ्या दासाने म्हटले, “नामीबरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी कन्या आहे.
Služabnik, ki je bil postavljen nad žanjce, je odgovoril in rekel: »To je moábska gospodična, ki je prišla z Naomí nazaj iz moábske dežele.
7 ७ ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यांमधला सरवा मला वेचू द्या.’ ती सकाळपासून आतापर्यंत तो वेचीत आहे, आत्ताच येथे थोडा वेळ मात्र विश्रांती घेण्यासाठी ती येथे आली आहे.”
Rekla je: ›Prosim vas, naj med snopi paberkujem za žanjci.‹ Tako je prišla in nadaljevala celo od jutra do sedaj, da se je le malo mudila v hiši.«
8 ८ बवाज रूथला म्हणाला, “मुली, तू माझे ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सरवा वेचायला जाऊ नकोस, येथेच माझ्या काम करणाऱ्या तरुण स्त्रियांबरोबर राहा.
Potem je Boaz rekel Ruti: »Ali ne slišiš, moja hči? Ne pojdi paberkovat na drugo polje niti ne pojdi od tod, temveč ostani tukaj blizu mojih dekel.
9 ९ हे ज्या शेताची कापणी करत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्यामागून जा. मी या लोकांस तुला त्रास देऊ नये अशी सूचना दिली आहे ना? आणि तुला तहान लागल्यास पाण्याच्या भांड्याकडे जाऊन नोकरांनी जे पाणी भरून ठेवले त्यातील पाणी पी.”
Naj bodo tvoje oči na polju, ki ga žanjejo in pojdi za njimi. Mar nisem mladeniče zadolžil, da se te ne bodo dotaknili? In ko si žejna, pojdi k posodam in pij od tega, kar so mladeniči zajeli.«
10 १० तेव्हा ती बवाजापुढे दंडवत घालून म्हणाली, “मज परक्या स्त्रीवर कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे कारण काय?”
Potem je padla na svoj obraz in se priklonila do tal in mu rekla: »Zakaj sem našla milost v tvojih očeh, da si se zmenil zame, glede na to, da sem tujka.«
11 ११ बवाज तिला म्हणाला, “तुझा पती मरण पावल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस आणि तू आपल्या आई-वडिलांना व जन्मदेश सोडून तुला जे लोक परिचित नाहीत अशा लोकात तू आलीस ही सविस्तर माहिती मला मिळाली आहे.
Boaz je odgovoril in ji rekel: »V polnosti mi je bilo prikazano vse, kar si storila svoji tašči, odkar je tvoj soprog umrl in kako si zapustila svojega očeta, svojo mater in svojo rojstno deželo in si prišla k ljudstvu, ki ga poprej nisi poznala.
12 १२ परमेश्वर तुझ्या कृतीचे फळ तुला देवो. ज्याच्या पंखाचा आश्रय करावयास तू आली आहेस तो इस्राएलाचा देव परमेश्वर तुला पुरे पारितोषिक देवो.”
Gospod naj ti povrne tvoje delo in polna nagrada naj ti bo dana od Gospoda, Izraelovega Boga, pod čigar peruti si prišla, da zaupaš.«
13 १३ मग ती म्हणाली, “माझ्या प्रभू, आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण माझ्याशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे.”
Potem je rekla: »Naj najdem naklonjenost v tvojem pogledu, moj gospod. Ker si me potolažil in ker si prijazno govoril s svojo pomočnico, čeprav nisem niti kakor ena izmed tvojih pomočnic.«
14 १४ भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
Boaz ji je rekel: »Ob času kosila pridi sèm in jej od kruha in pomakaj svoj košček v kis.« Usedla se je poleg žanjcev in on ji je podal opraženo zrnje in jedla je in bila nasičena in še je ostalo.
15 १५ ती सरवा वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्याला सांगितले, “तिला पेंढ्यांत वेचू द्या, मना करू नका.
Ko se je dvignila, da paberkuje, je Boaz svojim mladeničem zapovedal, rekoč: »Naj paberkuje celo med snopi in ne grajajte je.
16 १६ आणि चालता चालता पेंढ्यांतून मूठमूठ टाकत जा; तिला वेचू द्या, तिला धमकावू नका.”
Naj prav tako namenoma zanjo pade nekaj prgišč in pustite jih, da jih bo lahko pobrala in ne oštejte je.«
17 १७ तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सरवा झोडिला त्याचे एफाभर सातू निघाले.
Tako je na polju paberkovala celo do večera in otepla to, kar je nabrala in tega je bilo približno škaf ječmena.
18 १८ ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले.
In to je vzdignila ter odšla v mesto. Njena tašča je videla, kaj je nabrala in prinesla je in ji dala to, kar je shranila, potem ko je bila nasičena.
19 १९ तिच्या सासूने तिला विचारले, “आज तू कोठे सरवा वेचला? आणि हे काम कोठे केलेस? ज्याने तुला मदत केली, त्याचे कल्याण होवो.” मग आपण कोणाच्या शेतात आज काम केले ते तिने सासूला सांगितले. ती म्हणाली, “ज्याच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज आहे.”
Njena tašča ji je rekla: »Kje si danes paberkovala? Kje si delala? Blagoslovljen naj bo tisti, ki se je zmenil zate.« Svoji tašči je pokazala, s kom je delala in rekla: »Ime človeka, s katerim sem danes delala, je Boaz.«
20 २० नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.”
Naomí je rekla svoji snahi: »Blagoslovljen naj bo od Gospoda on, ki ni opustil svoje prijaznosti do živih in do mrtvih.« Naomí ji je rekla: »Mož nama je bližnji sorodnik, eden izmed najinih najožjih sorodnikov.«
21 २१ मग मवाबी रूथने सांगितले; “तो मला असेही म्हणाला की, ‘माझे गडी सर्व कापणी करत तोपर्यंत त्याच्या मागोमाग राहा.’”
Moábka Ruta je rekla: »Rekel mi je tudi: ›Trdno se boš držala mojih mladeničev, dokler ne zaključijo vse moje žetve.‹«
22 २२ नामी आपली सून रूथ हिला म्हणाली, “मुली, तू त्याच्याच नोकरीणींबरोबर जावे, इतरांच्या शेतात तू लोकांस दिसू नये हे बरे.”
Naomí je rekla svoji snahi Ruti: »Dobro je, moja hči, da greš ven z njegovimi deklami, da te ne srečajo na nobenem drugem polju.«
23 २३ या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरीणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.
Tako se je trdno držala Boazovih dekel, da paberkuje do konca ječmenove žetve in pšenične žetve in prebivala je s svojo taščo.