< रोम. 1 >
1 १ प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
ईश्वरो निजपुत्रमधि यं सुसंवादं भविष्यद्वादिभि र्धर्म्मग्रन्थे प्रतिश्रुतवान् तं सुसंवादं प्रचारयितुं पृथक्कृत आहूतः प्रेरितश्च प्रभो र्यीशुख्रीष्टस्य सेवको यः पौलः
2 २ देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते;
स रोमानगरस्थान् ईश्वरप्रियान् आहूतांश्च पवित्रलोकान् प्रति पत्रं लिखति।
3 ३ ती सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभू ह्याच्याविषयी आहे, जो देहासंबंधाने दाविदाच्या वंशात जन्मास आला.
अस्माकं स प्रभु र्यीशुः ख्रीष्टः शारीरिकसम्बन्धेन दायूदो वंशोद्भवः
4 ४ व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
पवित्रस्यात्मनः सम्बन्धेन चेश्वरस्य प्रभाववान् पुत्र इति श्मशानात् तस्योत्थानेन प्रतिपन्नं।
5 ५ त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
अपरं येषां मध्ये यीशुना ख्रीष्टेन यूयमप्याहूतास्ते ऽन्यदेशीयलोकास्तस्य नाम्नि विश्वस्य निदेशग्राहिणो यथा भवन्ति
6 ६ त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहात.
तदभिप्रायेण वयं तस्माद् अनुग्रहं प्रेरितत्वपदञ्च प्राप्ताः।
7 ७ रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्रजन होण्यास बोलावलेल्यांस देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हास कृपा व शांती मिळत राहो.
तातेनास्माकम् ईश्वरेण प्रभुणा यीशुख्रीष्टेन च युष्मभ्यम् अनुग्रहः शान्तिश्च प्रदीयेतां।
8 ८ मी तुमच्यातल्या सर्वांसाठी प्रथम येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या देवाचे उपकार मानतो कारण तुमचा विश्वास जगजाहीर होत आहे.
प्रथमतः सर्व्वस्मिन् जगति युष्माकं विश्वासस्य प्रकाशितत्वाद् अहं युष्माकं सर्व्वेषां निमित्तं यीशुख्रीष्टस्य नाम गृह्लन् ईश्वरस्य धन्यवादं करोमि।
9 ९ मी ज्याच्या पुत्राच्या सुवार्तेत माझ्या आत्म्याने ज्याची सेवा करीत आहे, तो देव माझा साक्षी आहे की, मी निरंतर माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करतो;
अपरम् ईश्वरस्य प्रसादाद् बहुकालात् परं साम्प्रतं युष्माकं समीपं यातुं कथमपि यत् सुयोगं प्राप्नोमि, एतदर्थं निरन्तरं नामान्युच्चारयन् निजासु सर्व्वप्रार्थनासु सर्व्वदा निवेदयामि,
10 १० आणि अशी विनवणी करतो की, आता शेवटी शक्यतो देवाच्या इच्छेने तुमच्याकडे माझे येणे व्हावे म्हणून माझा मार्ग मोकळा व्हावा.
एतस्मिन् यमहं तत्पुत्रीयसुसंवादप्रचारणेन मनसा परिचरामि स ईश्वरो मम साक्षी विद्यते।
11 ११ कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हास काही आत्मिक कृपादान दयावे ह्यासाठी मी तुम्हास भेटण्यास उत्कंठित आहे;
यतो युष्माकं मम च विश्वासेन वयम् उभये यथा शान्तियुक्ता भवाम इति कारणाद्
12 १२ म्हणजे आपल्या एकमेकांना तुमच्या व माझ्या, विश्वासाने, मला तुमच्याबरोबर उत्तेजन मिळावे.
युष्माकं स्थैर्य्यकरणार्थं युष्मभ्यं किञ्चित्परमार्थदानदानाय युष्मान् साक्षात् कर्त्तुं मदीया वाञ्छा।
13 १३ बंधूंनो, मला जसे इतर परराष्ट्रीयात फळ मिळाले, तसेच तुमच्यात काही फळ मिळावे म्हणून, मी तुमच्याकडे यावे असे पुष्कळदा योजले होते, पण आतापर्यंत अडथळे आले, ह्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे अशी माझी इच्छा नाही.
हे भ्रातृगण भिन्नदेशीयलोकानां मध्ये यद्वत् तद्वद् युष्माकं मध्येपि यथा फलं भुञ्जे तदभिप्रायेण मुहुर्मुहु र्युष्माकं समीपं गन्तुम् उद्यतोऽहं किन्तु यावद् अद्य तस्मिन् गमने मम विघ्नो जात इति यूयं यद् अज्ञातास्तिष्ठथ तदहम् उचितं न बुध्ये।
14 १४ मी ग्रीक व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्यांचा देणेकरी आहे.
अहं सभ्यासभ्यानां विद्वदविद्वताञ्च सर्व्वेषाम् ऋणी विद्ये।
15 १५ म्हणून मी माझ्याकडून रोममधील तुम्हासही सुवार्ता सांगण्यास उत्सुक आहे.
अतएव रोमानिवासिनां युष्माकं समीपेऽपि यथाशक्ति सुसंवादं प्रचारयितुम् अहम् उद्यतोस्मि।
16 १६ कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
यतः ख्रीष्टस्य सुसंवादो मम लज्जास्पदं नहि स ईश्वरस्य शक्तिस्वरूपः सन् आ यिहूदीयेभ्यो ऽन्यजातीयान् यावत् सर्व्वजातीयानां मध्ये यः कश्चिद् तत्र विश्वसिति तस्यैव त्राणं जनयति।
17 १७ कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.”
यतः प्रत्ययस्य समपरिमाणम् ईश्वरदत्तं पुण्यं तत्सुसंवादे प्रकाशते। तदधि धर्म्मपुस्तकेपि लिखितमिदं "पुण्यवान् जनो विश्वासेन जीविष्यति"।
18 १८ वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
अतएव ये मानवाः पापकर्म्मणा सत्यतां रुन्धन्ति तेषां सर्व्वस्य दुराचरणस्याधर्म्मस्य च विरुद्धं स्वर्गाद् ईश्वरस्य कोपः प्रकाशते।
19 १९ कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे.
यत ईश्वरमधि यद्यद् ज्ञेयं तद् ईश्वरः स्वयं तान् प्रति प्रकाशितवान् तस्मात् तेषाम् अगोचरं नहि।
20 २० कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. (aïdios )
फलतस्तस्यानन्तशक्तीश्वरत्वादीन्यदृश्यान्यपि सृष्टिकालम् आरभ्य कर्म्मसु प्रकाशमानानि दृश्यन्ते तस्मात् तेषां दोषप्रक्षालनस्य पन्था नास्ति। (aïdios )
21 २१ कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.
अपरम् ईश्वरं ज्ञात्वापि ते तम् ईश्वरज्ञानेन नाद्रियन्त कृतज्ञा वा न जाताः; तस्मात् तेषां सर्व्वे तर्का विफलीभूताः, अपरञ्च तेषां विवेकशून्यानि मनांसि तिमिरे मग्नानि।
22 २२ स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.
ते स्वान् ज्ञानिनो ज्ञात्वा ज्ञानहीना अभवन्
23 २३ आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली.
अनश्वरस्येश्वरस्य गौरवं विहाय नश्वरमनुष्यपशुपक्ष्युरोगामिप्रभृतेराकृतिविशिष्टप्रतिमास्तैराश्रिताः।
24 २४ म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले.
इत्थं त ईश्वरस्य सत्यतां विहाय मृषामतम् आश्रितवन्तः सच्चिदानन्दं सृष्टिकर्त्तारं त्यक्त्वा सृष्टवस्तुनः पूजां सेवाञ्च कृतवन्तः; (aiōn )
25 २५ त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. (aiōn )
इति हेतोरीश्वरस्तान् कुक्रियायां समर्प्य निजनिजकुचिन्ताभिलाषाभ्यां स्वं स्वं शरीरं परस्परम् अपमानितं कर्त्तुम् अददात्।
26 २६ या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले;
ईश्वरेण तेषु क्वभिलाषे समर्पितेषु तेषां योषितः स्वाभाविकाचरणम् अपहाय विपरीतकृत्ये प्रावर्त्तन्त;
27 २७ आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.
तथा पुरुषा अपि स्वाभाविकयोषित्सङ्गमं विहाय परस्परं कामकृशानुना दग्धाः सन्तः पुमांसः पुंभिः साकं कुकृत्ये समासज्य निजनिजभ्रान्तेः समुचितं फलम् अलभन्त।
28 २८ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
ते स्वेषां मनःस्वीश्वराय स्थानं दातुम् अनिच्छुकास्ततो हेतोरीश्वरस्तान् प्रति दुष्टमनस्कत्वम् अविहितक्रियत्वञ्च दत्तवान्।
29 २९ ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,
अतएव ते सर्व्वे ऽन्यायो व्यभिचारो दुष्टत्वं लोभो जिघांसा ईर्ष्या वधो विवादश्चातुरी कुमतिरित्यादिभि र्दुष्कर्म्मभिः परिपूर्णाः सन्तः
30 ३० निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे,
कर्णेजपा अपवादिन ईश्वरद्वेषका हिंसका अहङ्कारिण आत्मश्लाघिनः कुकर्म्मोत्पादकाः पित्रोराज्ञालङ्घका
31 ३१ निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले.
अविचारका नियमलङ्घिनः स्नेहरहिता अतिद्वेषिणो निर्दयाश्च जाताः।
32 ३२ आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्यांना ते संमतीही देतात.
ये जना एतादृशं कर्म्म कुर्व्वन्ति तएव मृतियोग्या ईश्वरस्य विचारमीदृशं ज्ञात्वापि त एतादृशं कर्म्म स्वयं कुर्व्वन्ति केवलमिति नहि किन्तु तादृशकर्म्मकारिषु लोकेष्वपि प्रीयन्ते।