< रोम. 9 >
1 १ मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
Правду кажу в Христї, не обманюю, як сьвідкуе менї (й) совість моя Духом сьвятим,
2 २ की, मला मोठे दुःख होत आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत राहणारी यातना आहे.
що великий мені смуток, і без устання болесть серцю моєму.
3 ३ कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.
Бо я сам бажав би бути відлученим від Христа за братів моїх, рідних мені по тїлу;
4 ४ ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव, करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
вони ж Ізраїльтяне, їх усиновленнє, і слава, й завіти, й даваннє закону, й судженнє, і обітування;
5 ५ पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. (aiōn )
їх і отці, з них і Христос по тїлу, що над усїм Бог, благословенний по віки. Амінь. (aiōn )
6 ६ पण देवाचे वचन, जणू व्यर्थ झाले असे नाही; कारण जे इस्राएलातले आहेत ते सर्वच इस्राएली नाहीत,
Не те ж воно, наче б слово Боже не сповнилось; бо не всі ті, що від Ізраїля, сї Ізраїльтяне,
7 ७ आणि ते अब्राहामाचे संतान आहेत म्हणून सर्व मुले आहेत असे नाही; तर ‘इसहाकालाच तुझे संतान म्हणले जाईल’ असे वचन आहे;
анї всі дїти, тим що вони насіннє Авраамове; нї, в Ісаакові (рече) назветь ся тобі насіннє.
8 ८ म्हणजे देहाची मुले ही देवाची मुले नाहीत, पण वचनाची मुले ही संतान म्हणून गणलेली आहेत.
Се єсть: не дїти тїлесні, се дїти Божі, а дїти обітування полічені в насіннє.
9 ९ कारण वचनाचा शब्द असा आहे की, ‘मी या ऋतूप्रमाणे येईन आणि सारेला मुलगा असेल.’
Слово бо обітування таке! Пори сієї прийду, і буде Сарі син.
10 १० आणि इतकेच नाही; पण ज्या एकापासून, म्हणजे आपला पूर्वज इसहाक ह्याच्यापासून रिबेका गरोदर असतेवेळी,
Не тільки ж (се); а й Ревека, що почала за одним разом од Ісаака, отця нашого;
11 ११ आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे,
ще бо не родились, анї зробили нічого доброго або лихого (щоб постанова Божа у вибранню пробувала, не по дїлам, а від Того, хто кличе).
12 १२ तिला सांगण्यात आले होते की, ‘मोठा धाकट्याची सेवा करील.’
сказано їй, що більший служити ме меншому,
13 १३ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘याकोबावर मी प्रीती केली पण एसावाचा द्वेष केला.’
яко ж писано: Якова злюбив я, а Ісава зненавидів.
14 १४ मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
Що ж скажемо? чи вже ж несправедливість у Бога? Нехай не буде.
15 १५ कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’
Глаголе бо Мойсейові: Помилую, кого помилую, і змилосерджусь, над ким змилосерджусь.
16 १६ तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.
Тим же воно нї від того, хто хоче, нї від того, хто біжить, а від милуючого Бога.
17 १७ म्हणून शास्त्रलेख फारोला म्हणतो, ‘मी तुला ह्यासाठी मोठे केले की, तुझ्याद्वारे मी माझे सामर्थ्य प्रकट करावे आणि सर्व पृथ्वीवर माझे नाव गाजविले जावे.’
Глаголе бо писаннє й Фараонові: Що на се іменно підняв я тебе, щоб показати на тобі силу мою, і щоб звістилось імя мов по всій землі.
18 १८ म्हणजे परमेश्वराची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो आणि त्याची इच्छा असेल त्यास तो कठिण करतो.
Тим ж то, кого хоче, милує, а кого хоче, ожорсточує (окаменює).
19 १९ तू ह्यावर म्हणशील की, तो तरीही दोष का लावतो? त्याच्या योजनेला कोणी विरोध केला आहे?
Скажеш же мені: Чого ж іще й винуватить? хто встояв проти волї Його?
20 २० पण उलट अरे बंधू, तू जो देवाला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? तू मला असे का केलेस, अशी कोणती वस्तू करणार्याला म्हणू शकेल?
Хто ж се ти, чоловіче, що змагаєш ся з Богом? Хиба скаже зроблене тому, хто зробив його: Нащо вробив єси мене так?
21 २१ कुंभाराने एकाच गोळ्यामधून एक पात्र मानासाठी तर दुसरे अपमानासाठी करायला मातीवर अधिकार नाही काय?
Або не має впасти ганчар над глиною, щоб з того самого місива зробити одну посудину на честь, а другу на нечесть?
22 २२ मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,
Коли ж, хотячи Бог показати гнїв свій, і явити силу свою, щадив у великому довготерпінню посуди гнїва, наготовлені на погибель,
23 २३ आणि गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
і щоб явити богацтво слави своєї на посудах милости, котрих наперед наготовив на славу,
24 २४ त्याने ज्यांना केवळ यहूद्यांमधून नाही, पण परराष्ट्रीयामधूनही बोलावले आहे ते आपण ती दयेची पात्रे आहोत.
як і над нами, котрих покликав не тільки з Жидів, та й з поган?
25 २५ कारण तो होशेयाच्या ग्रंथात असेही म्हणतो की, ‘जे माझी प्रजा नव्हते त्यांना मी माझी प्रजा म्हणेन, आणि जी माझी आवडती नव्हती, तिला मी माझी आवडती म्हणेन.
Як і в Осії глаголе: Назву немоїх людей людьми моїми, і неполюблену полюбленою.
26 २६ आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’
І буде на місцї, де сказано їм: не мій ви народ, там назвуть ся синами Бога живого.
27 २७ यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.
Ісаія ж покликує про Ізраїля: Хочби було число синів Ізраїлевих як пісок морський, останок (тільки) спасеть ся:
28 २८ कारण सर्व संपवून थांबविल्याप्रमाणे प्रभू पृथ्वीवर आपले वचन पूर्ण करील.’
скінчивши бо слово, поскорить ся в правдї; бо скоро слово зробить Господь на землі.
29 २९ आणि यशयाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे, सैन्यांच्या प्रभूने जर आपल्यासाठी बीज ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे असतो आणि गमोरासारखे झालो असतो.
І яко ж прорік Ісаія: Коли б Господь Саваот не зоставив нам насїння, були б ми, як Содома, й уподобились би Гоморі.
30 ३० मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्त्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्त्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्त्व मिळविले आहे.
Що ж скажемо? Що погане, котрі не вганяли за праведностю, настигли праведність, праведність, що од віри;
31 ३१ पण जे इस्राएल नीतिमत्त्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
Ізраїль же, вганяючи за праведностю, не настиг закону праведности.
32 ३२ आणि का? कारण ते विश्वासाने नाही, पण कृतींनी त्याच्यामागे लागले कारण ते अडखळणाच्या दगडावर अडखळले.
Чому? Тому, що (шукали праведности) не од віри, а якби од учинків закону; спіткнулись бо на камінь спотикання.
33 ३३ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘बघा, मी सियोनात एक अडखळण्याचा दगड, एक अडथळ्याचा खडक ठेवतो. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Яко ж писано: Ось кладу в Сіонї камінь спотикання і камень поблазнї, а всякий, хто вірув в Него, не осоромить ся.