< रोम. 8 >
1 १ म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
ये जनाः ख्रीष्टं यीशुम् आश्रित्य शारीरिकं नाचरन्त आत्मिकमाचरन्ति तेऽधुना दण्डार्हा न भवन्ति।
2 २ कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
जीवनदायकस्यात्मनो व्यवस्था ख्रीष्टयीशुना पापमरणयो र्व्यवस्थातो माममोचयत्।
3 ३ कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
यस्माच्छारीरस्य दुर्ब्बलत्वाद् व्यवस्थया यत् कर्म्मासाध्यम् ईश्वरो निजपुत्रं पापिशरीररूपं पापनाशकबलिरूपञ्च प्रेष्य तस्य शरीरे पापस्य दण्डं कुर्व्वन् तत्कर्म्म साधितवान्।
4 ४ म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी.
ततः शारीरिकं नाचरित्वास्माभिरात्मिकम् आचरद्भिर्व्यवस्थाग्रन्थे निर्द्दिष्टानि पुण्यकर्म्माणि सर्व्वाणि साध्यन्ते।
5 ५ कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात.
ये शारीरिकाचारिणस्ते शारीरिकान् विषयान् भावयन्ति ये चात्मिकाचारिणस्ते आत्मनो विषयान् भावयन्ति।
6 ६ देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
शारीरिकभावस्य फलं मृत्युः किञ्चात्मिकभावस्य फले जीवनं शान्तिश्च।
7 ७ कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.
यतः शारीरिकभाव ईश्वरस्य विरुद्धः शत्रुताभाव एव स ईश्वरस्य व्यवस्थाया अधीनो न भवति भवितुञ्च न शक्नोति।
8 ८ म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.
एतस्मात् शारीरिकाचारिषु तोष्टुम् ईश्वरेण न शक्यं।
9 ९ पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही.
किन्त्वीश्वरस्यात्मा यदि युष्माकं मध्ये वसति तर्हि यूयं शारीरिकाचारिणो न सन्त आत्मिकाचारिणो भवथः। यस्मिन् तु ख्रीष्टस्यात्मा न विद्यते स तत्सम्भवो नहि।
10 १० पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे.
यदि ख्रीष्टो युष्मान् अधितिष्ठति तर्हि पापम् उद्दिश्य शरीरं मृतं किन्तु पुण्यमुद्दिश्यात्मा जीवति।
11 ११ पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.
मृतगणाद् यीशु र्येनोत्थापितस्तस्यात्मा यदि युष्मन्मध्ये वसति तर्हि मृतगणात् ख्रीष्टस्य स उत्थापयिता युष्मन्मध्यवासिना स्वकीयात्मना युष्माकं मृतदेहानपि पुन र्जीवयिष्यति।
12 १२ म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही
हे भ्रातृगण शरीरस्य वयमधमर्णा न भवामोऽतः शारीरिकाचारोऽस्माभि र्न कर्त्तव्यः।
13 १३ कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
यदि यूयं शरीरिकाचारिणो भवेत तर्हि युष्माभि र्मर्त्तव्यमेव किन्त्वात्मना यदि शरीरकर्म्माणि घातयेत तर्हि जीविष्यथ।
14 १४ कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत.
यतो यावन्तो लोका ईश्वरस्यात्मनाकृष्यन्ते ते सर्व्व ईश्वरस्य सन्ताना भवन्ति।
15 १५ कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे.
यूयं पुनरपि भयजनकं दास्यभावं न प्राप्ताः किन्तु येन भावेनेश्वरं पितः पितरिति प्रोच्य सम्बोधयथ तादृशं दत्तकपुत्रत्वभावम् प्राप्नुत।
16 १६ तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत.
अपरञ्च वयम् ईश्वरस्य सन्ताना एतस्मिन् पवित्र आत्मा स्वयम् अस्माकम् आत्माभिः सार्द्धं प्रमाणं ददाति।
17 १७ आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत.
अतएव वयं यदि सन्तानास्तर्ह्यधिकारिणः, अर्थाद् ईश्वरस्य स्वत्त्वाधिकारिणः ख्रीष्टेन सहाधिकारिणश्च भवामः; अपरं तेन सार्द्धं यदि दुःखभागिनो भवामस्तर्हि तस्य विभवस्यापि भागिनो भविष्यामः।
18 १८ कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.
किन्त्वस्मासु यो भावीविभवः प्रकाशिष्यते तस्य समीपे वर्त्तमानकालीनं दुःखमहं तृणाय मन्ये।
19 १९ कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
यतः प्राणिगण ईश्वरस्य सन्तानानां विभवप्राप्तिम् आकाङ्क्षन् नितान्तम् अपेक्षते।
20 २० कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली;
अपरञ्च प्राणिगणः स्वैरम् अलीकताया वशीकृतो नाभवत्
21 २१ कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल.
किन्तु प्राणिगणोऽपि नश्वरताधीनत्वात् मुक्तः सन् ईश्वरस्य सन्तानानां परममुक्तिं प्राप्स्यतीत्यभिप्रायेण वशीकर्त्रा वशीचक्रे।
22 २२ कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे.
अपरञ्च प्रसूयमानावद् व्यथितः सन् इदानीं यावत् कृत्स्नः प्राणिगण आर्त्तस्वरं करोतीति वयं जानीमः।
23 २३ आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत.
केवलः स इति नहि किन्तु प्रथमजातफलस्वरूपम् आत्मानं प्राप्ता वयमपि दत्तकपुत्रत्वपदप्राप्तिम् अर्थात् शरीरस्य मुक्तिं प्रतीक्षमाणास्तद्वद् अन्तरार्त्तरावं कुर्म्मः।
24 २४ कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशाही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?
वयं प्रत्याशया त्राणम् अलभामहि किन्तु प्रत्यक्षवस्तुनो या प्रत्याशा सा प्रत्याशा नहि, यतो मनुष्यो यत् समीक्षते तस्य प्रत्याशां कुतः करिष्यति?
25 २५ पण जी गोष्ट आपल्याला दिसत नाही तिची आपण आशा केली, तर आपण धीराने प्रतीक्षा करतो.
यद् अप्रत्यक्षं तस्य प्रत्याशां यदि वयं कुर्व्वीमहि तर्हि धैर्य्यम् अवलम्ब्य प्रतीक्षामहे।
26 २६ त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो.
तत आत्मापि स्वयम् अस्माकं दुर्ब्बलतायाः सहायत्वं करोति; यतः किं प्रार्थितव्यं तद् बोद्धुं वयं न शक्नुमः, किन्त्वस्पष्टैरार्त्तरावैरात्मा स्वयम् अस्मन्निमित्तं निवेदयति।
27 २७ आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
अपरम् ईश्वराभिमतरूपेण पवित्रलोकानां कृते निवेदयति य आत्मा तस्याभिप्रायोऽन्तर्य्यामिना ज्ञायते।
28 २८ कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
अपरम् ईश्वरीयनिरूपणानुसारेणाहूताः सन्तो ये तस्मिन् प्रीयन्ते सर्व्वाणि मिलित्वा तेषां मङ्गलं साधयन्ति, एतद् वयं जानीमः।
29 २९ कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
यत ईश्वरो बहुभ्रातृणां मध्ये स्वपुत्रं ज्येष्ठं कर्त्तुम् इच्छन् यान् पूर्व्वं लक्ष्यीकृतवान् तान् तस्य प्रतिमूर्त्याः सादृश्यप्राप्त्यर्थं न्ययुंक्त।
30 ३० आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
अपरञ्च तेन ये नियुक्तास्त आहूता अपि ये च तेनाहूतास्ते सपुण्यीकृताः, ये च तेन सपुण्यीकृतास्ते विभवयुक्ताः।
31 ३१ मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?
इत्यत्र वयं किं ब्रूमः? ईश्वरो यद्यस्माकं सपक्षो भवति तर्हि को विपक्षोऽस्माकं?
32 ३२ आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
आत्मपुत्रं न रक्षित्वा योऽस्माकं सर्व्वेषां कृते तं प्रदत्तवान् स किं तेन सहास्मभ्यम् अन्यानि सर्व्वाणि न दास्यति?
33 ३३ देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.
ईश्वरस्याभिरुचितेषु केन दोष आरोपयिष्यते? य ईश्वरस्तान् पुण्यवत इव गणयति किं तेन?
34 ३४ दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
अपरं तेभ्यो दण्डदानाज्ञा वा केन करिष्यते? योऽस्मन्निमित्तं प्राणान् त्यक्तवान् केवलं तन्न किन्तु मृतगणमध्याद् उत्थितवान्, अपि चेश्वरस्य दक्षिणे पार्श्वे तिष्ठन् अद्याप्यस्माकं निमित्तं प्रार्थत एवम्भूतो यः ख्रीष्टः किं तेन?
35 ३५ ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तलवार करील काय?
अस्माभिः सह ख्रीष्टस्य प्रेमविच्छेदं जनयितुं कः शक्नोति? क्लेशो व्यसनं वा ताडना वा दुर्भिक्षं वा वस्त्रहीनत्वं वा प्राणसंशयो वा खङ्गो वा किमेतानि शक्नुवन्ति?
36 ३६ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’
किन्तु लिखितम् आस्ते, यथा, वयं तव निमित्तं स्मो मृत्युवक्त्रेऽखिलं दिनं। बलिर्देयो यथा मेषो वयं गण्यामहे तथा।
37 ३७ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
अपरं योऽस्मासु प्रीयते तेनैतासु विपत्सु वयं सम्यग् विजयामहे।
38 ३८ कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले,
यतोऽस्माकं प्रभुना यीशुख्रीष्टेनेश्वरस्य यत् प्रेम तस्माद् अस्माकं विच्छेदं जनयितुं मृत्यु र्जीवनं वा दिव्यदूता वा बलवन्तो मुख्यदूता वा वर्त्तमानो वा भविष्यन् कालो वा उच्चपदं वा नीचपदं वापरं किमपि सृष्टवस्तु
39 ३९ किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
वैतेषां केनापि न शक्यमित्यस्मिन् दृढविश्वासो ममास्ते।