< रोम. 7 >

1 बंधूंनो, (नियमशास्त्राची माहीती असणार्‍यांशी मी बोलत आहे) मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय?
ओ साथी विश्वासियो! आऊँ बिधानो खे जाणने वाल़ेया खे बोलूँआ, क्या तुसे नि जाणदे कि जदुओ तक मांणू जिऊँदा रओआ, तदुओ तक ई तिना खे बिधान मानणा पड़ोआ?
2 कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते.
ब्यायी री जवाणस बिधानो रे मुताबिक आपणे लाड़े रे जिऊँदे जिऊए, तेस साथे बंदी री रओई। पर जे लाड़ा मरी जाओ, तो से लाड़े रा बिधानो ते जो तेसा खे तेसते बानी की राखोई छूटी जाओई।
3 म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
जे से आपणे लाड़े रे जिऊँदे जिऊए केसी ओरी मर्दो साथे रिश्ता बणाई लओ, तो तेसा खे व्याभिचारिणी बोलोए। पर जे लाड़ा मरी जाओ, तो से तेसा बिधानो ते छूटी गी, एथो तक कि से केसी ओरी मर्दो साथे ब्या करी लओगी, तो तेबे व्याभिचारिणी नि ऊणी।
4 आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.
तो ओ साथी विश्वासियो! जेबे तुसे मसीह साथे मरी गे तो तुसे बिधानो खे मरी गे। पर एबे तुसे मसीह रे मतलब जो मरे रेया बीचा ते जिऊँदा ऊईगा बणी गे रे, ताकि आसे परमेशरो खे फल ल्याऊँ।
5 कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.
जेबे आसे पापी शरीरो रे वशो रे थे, तो पापो री इच्छा, जो बिधानो ते थी, मौता रा फल पैदा करने खे, आसा रे अंगा रे काम करो थी।
6 पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
पर आसे बिधानो खे मरी गे जेसरे बंदनो रे आसे पईले बंदी रे थे, एबे आसे बिधानो ते छूटी गे। ईंयां आसे पुराणी लिखी रा बिधानो रे मुताबिक नि, बल्कि पवित्र आत्मा रे मुताबिक नईया रीतिया ते परमेशरो री सेवा करूँए।
7 मग काय म्हणावे? नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते कारण ‘लोभ धरू नको’ असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता.
तो आसे क्या बोलूँ? क्या बिधान पाप ए? कदी पनि, बल्कि बिना बिधानो ते आऊँ पापो खे नि पछयाणदा। जे बिधान नि बोलदा, “लाल़च नि कर,” तो आऊँ ये नि जाणदा कि लाल़च क्या ए।
8 पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते.
पर पापे मौका पाई की आज्ञा रे जरिए मांदे सब किस्मा रा लाल़च पैदा कित्तेया। कऊँकि बिना बिधानो ते पाप मुड़दा ए।
9 कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो.
एक बखत था जेबे आऊँ बिधानो खे नि जाणूं था और आँऊ जिऊँदा था। पर जेबे मैं आज्ञा खे जाणेया तेबे मेरे पितरे पाप करने री इच्छा जागी और आऊँ परमेशरो ते दूर ऊईगा।
10 १० आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली, हे मला दिसले.
सेई आज्ञा, जो जिन्दगी देणे खे थी, माखे मौता री बजअ ऊई।
11 ११ पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले.
कऊँकि पापे मौका पाई की आज्ञा रे जरिए आऊँ बईकाया, और तिजी साथे आऊँ कायी बी दित्तेया।
12 १२ म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
ईंयां आसे देखूँए कि बिधान पवित्र ए और तिजी री आज्ञा पवित्र ए, ठीक ए और खरी ए।
13 १३ मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न होवो. पण जी चांगली आहे, तिच्या योगे, पाप हे पाप असे प्रकट व्हावे, म्हणून माझ्यात, ती मरण हा परिणाम घडविते; म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले.
तो क्या बिधान जो अच्छा था, माखे मौत ऊई? कदी पनि। बल्कि पाप तेसा खरी चीजे की माखे मौत पैदा करने वाल़ा ऊआ ताकि तेसरा पाप सामणे आओ, और आज्ञा रे जरिए पाप बऊत जादा पापमय ठईरो।
14 १४ कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.
आसे जाणूंए कि बिधान तो आत्मिक ए। पर आऊँ सिर्फ एक माणूं ए और शरीर और पापो री गुलामिया रे पूरिया तरअ ते बिकी रा।
15 १५ कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो.
और जो आऊँ करूँआ, से नि जाणदा, कऊँकि जो आऊँ चाऊँआ, से नि करदा, पर जेतेते माखे नफरत ओई, सेई करूँआ।
16 १६ मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो.
जे, जो आऊँ चांअदा नि, सेई करूँआ, तो आऊँ मानी लऊँआ कि बिधान खरा ए।
17 १७ मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
तो एड़ी दशा रे तेसा खे करने वाल़ा आऊँ निए, बल्कि पाप ए, जो मांदे बसी रा।
18 १८ कारण मी जाणतो की, माझ्यात, म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही.
कऊँकि आऊँ जाणूंआ कि मांदे मतलब मेरे पापी शरीरो रे कोई खरी चीज वास नि करदी। पले काम करने री इच्छा तो मांदे आयी, पर खरे काम मांते नि ऊँदे।
19 १९ कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो.
कऊँकि जेस खरे कामो री इच्छा आऊँ करूँआ, पर करी नि सकदा, पर जेसा बुराईया री इच्छा नि करदा, सेई करूँआ।
20 २० मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.
पर जे आऊँ सेई करूँआ, जेतेरी इच्छा नि करदा, तो से करने वाल़ा आऊँ नि रया, पर पाप, जो मांदे बसी रा।
21 २१ मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो.
ईंयां मेरा अनुभव ये कि जेबे आँऊ खरा करने री इच्छा करूँआ, तो मांते बुरा काम ई ऊई जाओआ।
22 २२ कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;
आऊँ दिलो ते तो परमेशरो रा बिधानो ते बऊत खुश रऊँआ,
23 २३ पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.
पर माखे आपणे शरीरो रे अंगा रे दूजा ई बिधान दिखोई, जो मेरी अक्ला रा बिधानो ते लड़ोई और माखे पापो रा बिधानो रे बंदनो रे पाई देओई, जो मेरे शरीरो रे अंगा रे ए।
24 २४ मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील?
आऊँ केड़ा बदनसीब मांणू ए। आऊँ एस शरीरो ते जो मौत लयी की आओई केस छुड़ाणा?
25 २५ मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
आऊँ परमेशरो रा धन्यवाद करूँआ जिने माखे प्रभु यीशु मसीह रे जरिए उद्धार दित्तेया। ईंयां तो आऊँ आपणी अक्ला ते परमेशरो रे बिधानो राए, पर शरीरो ते पापो रे बिधानो रा इस्तेमाल करूँआ।

< रोम. 7 >