< रोम. 5 >
1 १ आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे.
Opravičivši se torej z vero, imamo mir z Bogom po Gospodu našem Jezusu Kristusu,
2 २ आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Po kterem smo tudi pristop dobili z vero v to milost, v kterej stojimo in hvalimo se z upom slave Božje.
3 ३ आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,
Pa ne samo to, nego se tudi hvalimo v stiskah vedoč, da stiska potrpljivost dela,
4 ४ आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
A potrpljivost izkušenost, izkušenost pa up,
5 ५ आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.
A up ne osramočuje, ker je ljubezen Božja izlita v srcih naših po Duhu svetem danem nam.
6 ६ कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला.
Kajti Kristus je, ko smo mi še slabi bili, svoj čas za nepobožne umrl,
7 ७ कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील,
Ker bo težko kdo za pravičnega umiral, za dobrega lahko da se kdo drzne umreti.
8 ८ पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
Pokazuje pa Bog svojo ljubezen do nas, da je, ko smo mi še grešniki bili, Kristus za nas umrl.
9 ९ मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
Mnogo bolje se bomo torej, opravičivši se sedaj v krvi njegovej, po njem jeze rešili.
10 १० कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
Kajti če smo se spravili z Bogom s smrtjo njegovega sina, dokler smo sovražniki bili, s tem bolje se bomo zveličali spravivši se v njegovem življenji.
11 ११ इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.
Pa ne samo to, nego se tudi hvalimo z Bogom po Gospodu svojem Jezusu Kristusu, po kterem smo sedaj spravo dobili.
12 १२ म्हणून एका मनुष्याद्वारे जगात पाप आले व पापाद्वारे मरण आले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व मनुष्यांवर मरण आले.
Za to kakor je po enem človeku greh na svet prišel in po grehu smrt, in tako je na vse ljudî smrt prišla, v komer so vsi pregrešili.
13 १३ करण नियमशास्त्रापुर्वी जगात पाप होते, पण नियमशास्त्र नसतेवेळी पाप हिशोबात येत नाही.
Kajti greh je bil noter do postave na svetu, ali se greh ne računi, dokler ni postave.
14 १४ तरी मरणाने आदामापासून मोशेपर्यंत राज्य केले; आदामाच्या उल्लंघनाच्या रूपाप्रमाणे ज्यांनी पाप केले नव्हते त्यांच्यावरही राज्य केले आणि तो तर जो पुढे येणार होता त्याचा नमुना होता.
Nego zakraljevala je smrt od Adama do Mojzesa tudi nad temi, kteri niso pregrešili na spodobo Adamovega prestopa, kteri je podoba tega, kteri je imel priti.
15 १५ पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मरण पावले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.
Ali ni kakor pregreha tako tudi dar, kajti če so po pregrehi enega mnogi pomrli, za mnogo boljo se jo milost Božja in dar v milosti enega človeka Jezusa Kristusa na mnoge poobilšal.
16 १६ आणि पाप करणार्या एकामुळे जसा परिणाम झाला, तशी देणगीची गोष्ट नाही; कारण एका अपराधामुळे दंडाज्ञेसाठी न्याय आला, पण अनेक अपराधांमुळे निर्दोषीकरणासाठी कृपादान आले.
In dar ni kakor greh enega, ker obsojenje je bilo iz ene pregrehe na pogubo, a dar iz mnogih pregreh na opravičenje.
17 १७ कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्त्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
Kajti če je za pregreho enega smrt zakraljevala po tem enem, za mnogo bolje bodo tisti, kteri prejemajo obilnost milosti in darú pravice, v življenji kraljevali po enem Jezusu Kristusu.
18 १८ म्हणून जसे एकाच अपराधामुळे सर्व मनुष्यांना दंडाज्ञा ठरविण्यास कारण झाले, तसे एकाच निर्दोषीकरणामुळे सर्व मनुष्यांना जीवनासाठी नीतिमान ठरविण्यास कारण झाले.
Kakor je torej po pregrehi enega prišlo obsojenje na vse ljudi, tako je tudi po pravičnosti enega prišlo na vse ljudi opravičenje življenja.
19 १९ कारण जसे एकाच्या आज्ञाभंगामुळे अनेक जण पापी ठरवले गेले, तसे एकाच्या आज्ञापालनामुळे अनेक जण नीतिमान ठरवले जातील.
Kajti kakor so po neposlušnosti enega človeka grešni postali mnogi, tako bodo tudi po poslušnosti enega pravični postali mnogi.
20 २० शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
A postava je zravni tega prišla, da se pomnoži pregreha, a kjer se pregreha pomnoži, tam se še bolje poobilša milost,
21 २१ म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे. (aiōnios )
Da bi, kakor je zakraljeval greh za smrt, tako tudi zakraljevala milost s pravico na večno življenje po Jezusu Kristusu Gospodu našem. (aiōnios )