< रोम. 4 >
1 १ तर मग आपला पूर्वज अब्राहाम ह्याला दैहिक दृष्ट्या काय मिळाले असे आपण म्हणावे?
येकोलायी हम का कहबो हमरो बुजूर्ग अब्राहम ख का मिल्यो?
2 २ कारण अब्राहाम कर्मांनी नीतिमान ठरला असता तर त्यास अभिमान मिरवण्यास कारण होते; पण देवापुढे नाही.
कहालीकि यदि अब्राहम कामों सी सच्चो ठहरायो जातो, त ओख घमण्ड करन कि जागा होती, पर परमेश्वर की नजर म नहीं।
3 ३ कारण शास्त्रलेख काय म्हणतो? अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.
पवित्र शास्त्र का कह्य हय? यो कि “अब्राहम न परमेश्वर पर विश्वास करयो, अऊर ओको विश्वास को वजह परमेश्वर न सच्चो स्वीकार करयो।”
4 ४ आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.
काम करन वालो की मजूरी देनो दान नहाय, पर हक्क समझ्यो जावय हय।
5 ५ पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणला जातो,
पर जो विश्वास पर निर्भर रह्य हय, नहीं कि कामों पर अऊर परमेश्वर पर विश्वास करय हय, जो परमेश्वर अभक्तिहीन ख भक्तिहीन बनावय हय अऊर ओको योच परमेश्वर पर को विश्वास सी परमेश्वर ओख सच्चो ठहरावय हय।
6 ६ देव ज्याच्या बाजूकडे कर्मांशिवाय नीतिमत्त्व गणतो अशा मनुष्याचा आशीर्वाद दावीद देखील वर्णन करतो; तो असे म्हणतो की,
जेक परमेश्वर बिना कर्मों को सच्चो ठहरावय हय, ओख दाऊद भी धन्य कह्य हय:
7 ७ ‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत.
“धन्य हंय हि जिन्को अपराध माफ भयो, अऊर जिन्को पाप झाक्यो गयो।
8 ८ ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’
धन्य हय ऊ आदमी जेक परमेश्वर पापी नहीं ठहराये!”
9 ९ मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता.
जो धन्य होन की बात दाऊद कह्य रह्यो हय, का यहूदी लायी हय नहीं पर यो बिना गैरयहूदी लायी भी हय जसो हम वचन म सुनजे हय यो कहजे हंय, “अब्राहम न परमेश्वर पर विश्वास करयो अऊर ओको विश्वास को वजह परमेश्वर न ओख सच्चो स्वीकार करयो।”
10 १० मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर.
त यो कब भयो? का जब ओको खतना होय गयो होतो यां जब ऊ बिना खतना को होतो? नहीं खतना होन को बाद नहीं पर खतना होन सी पहिले भयो।
11 ११ आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्यास मिळालेल्या नीतिमत्त्वाचा शिक्का म्हणून त्यास सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्त्व गणले जावे.
अऊर ओको खतना बाद म भयो होतो अऊर खतना होनो ऊ एक चिन्ह बन्यो ताकि दर्शा सके कि परमेश्वर न ओको खतना होनो सी पहिलेच ओको विश्वास को द्वारा सच्चो स्वीकार करयो अऊर अब्राहम सब विश्वासियों आत्मिक बाप बन्यो यद्दपि ऊ बिना खतना को हय पर विश्वास हय येकोलायी ऊ भी सच्चो स्वीकार करयो जायेंन।
12 १२ आणि जे सुंता झालेले आहेत ते केवळ सुंता झालेले आहेत एवढ्यावरून नाही, पण आपला पिता अब्राहाम हा सुंता न झालेला होता तेव्हा त्याच्यात असलेल्या त्याच्या विश्वासास अनुसरुन जे चालतात त्यांचाही त्याने पिता व्हावे.
अऊर ऊ उन्को भी बाप हय जिन्को खतना भयो हय ताकी ऊ लोग केवल खतना भयो वालोच नहीं होतो, बल्की हमरो बाप अब्राहम को विश्वास को पद चिन्हों पर चलन वालो होतो ऊ अब्राहम जो खतना होनो सी पहिलो चल्यो।
13 १३ कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.
जब परमेश्वर न अब्राहम सी अऊर ओको वंश सी प्रतिज्ञा की ऊ जगत को वारिस होयेंन, या प्रतिज्ञा अब्राहम ख व्यवस्था को पालन सीच नहीं मिल्यो पर ओन विश्वास करयो अऊर ऊ परमेश्वर को द्वारा सच्चो स्वीकार करयो गयो यो वजह मिल्यो।
14 १४ कारण नियमशास्त्रामुळे जे आहेत ते वारीस झाले तर विश्वास निरर्थक आणि वचन निरुपयोगी केले गेले.
अऊर येकोलायी यदि आप मानय हो कि परमेश्वर न दियो भयो प्रतिज्ञा या व्यवस्था को पालन करन वालो को वजह मिल्यो त तुम्हरो विश्वास बेकार हय अऊर परमेश्वर की प्रतिज्ञा भी बेकार होय जावय हय।
15 १५ कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
व्यवस्था सी परमेश्वर को गुस्सा प्रगट होवय हय, पर, जित व्यवस्था नहाय उत ओको उल्लंघन नहाय।
16 १६ आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.
योच वजह प्रतिज्ञा विश्वास पर आधारित हय अऊर या परमेश्वर की मुक्त भेंट आय, पूरो अब्राहम को वंशजों लायी, न केवल ओको लायी जो व्यवस्था वालो हय बल्की उन्को लायी भी जो अब्राहम को जसो विश्वास वालो हंय; कहालीकि अब्राहम हम सब को आत्मिक बाप आय,
17 १७ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.’ ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, जो मरण पावलेल्यांना जिवंत करतो आणि अस्तित्वात नसलेल्यांना ते असल्याप्रमाणे बोलावतो त्या देवाच्या दृष्टीपुढे तो असा आहे.
जसो शास्त्र म लिख्यो हय, “मय न तोख बहुत सी राष्ट्रों को बाप ठहरायो हय” अऊर या प्रतिज्ञा परमेश्वर कि नजर म ठीक हय, यो ऊ परमेश्वर हय जेको पर अब्राहम न विश्वास करयो, अऊर जो मरयो हुयो ख जीन्दो करय हय, अऊर जो परमेश्वर अस्तित्व रहित बातों सी प्रगट करय हय।
18 १८ ‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला.
जसो शास्त्र म लिख्यो हय ऊ तय बहुत सी राष्ट्रों को बाप होयेंन “तोरो वंश तारों को जसो होयेंन या बात पर आशा रखन को कोयी वजह नहीं होतो फिर भी अब्राहम न विश्वास अऊर आशा रखेंन।
19 १९ आणि विश्वासात दुर्बळ नसल्यामुळे, तो सुमारे शंभर वर्षांचा असता त्याने आपल्या निर्जीव शरीराकडे व सारेच्या उदराच्या वांझपणाकडे लक्ष दिले नाही.
कहालीकि ऊ लगभग सौ साल को होय गयो होतो, पर ओको विश्वास ओको शरीर को जसो कमजोर नहीं भयो होतो, जसो की ओको शरीर लगभग मरयो हुयो होय चुक्यो होतो, अऊर सच्चायी त यो भी हय, सारा को गर्भ भी बच्चां ख जनम नहीं दे सकत होती।
20 २० त्याने देवाच्या वचनाविषयी अविश्वासाने संशय धरला नाही; तो विश्वासात स्थिर असल्यामुळे देवाला गौरव देत होता.
तब भी ओन अपनो विश्वास ख नहीं छोड़्यो अऊर न परमेश्वर की प्रतिज्ञा पर शक करयो, ओको विश्वास न सामर्थ सी भरयो अऊर ओन परमेश्वर की महिमा करी;
21 २१ आणि त्याची पूर्ण खात्री झाली की, देव आपले अभिवचन पूर्ण करण्यासही तो समर्थ आहे.
अऊर ओख पूरो भरोसा हय कि जो बात की परमेश्वर न प्रतिज्ञा करी हय, ऊ ओख पूरो करन म भी समर्थ हय।
22 २२ आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.
यो वजह परमेश्वर न अब्राहम ख ओको विश्वास को द्वारा ओख सच्चो स्वीकार करयो।
23 २३ आता ते त्याच्या हिशोबी गणले गेले, हे केवळ त्याच्याकरता लिहिले गेले नाही.
अऊर यो वचन, विश्वास को द्वारा सच्चो स्वीकार करनो” केवल ऊ अकेलो लायी नहीं लिख्यो गयो,
24 २४ पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मरण पावलेल्यातून उठवले त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे.
यो बल्की हमरो लायी भी लिख्यो गयो, जो हम सच्चो ठहरायो गयो, जो हम यीशु पर विश्वास करय हंय जो हमरो प्रभु जो मृत्यु म सी जीन्दो भयो ओको पर विश्वास करजे हय।
25 २५ तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे.
कहालीकि ऊ हमरो पापों को वजह सौंप्यो गयो, अऊर हम्ख परमेश्वर को संग सच्चो ठहरान लायी मृत्यु म सी जीन्दो भयो।