< रोम. 3 >
1 १ मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ?
Чим же переважує Жидовин? або яка користь з обрізання?
2 २ सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
Велика на всякий спосіб: найперше бо, що їм були звірені словеса Божі.
3 ३ पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?
Що бо, що не увірували деякі? Хиба невірство їх віру Божу оберне в нїщо?
4 ४ कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
Нехай не буде (так). Нї, (нехай буде) Бог правдивий, усякий же чоловік омана, яко ж писано: Щоб оправдив ся Ти в словах Твоїх, і побідив, як судити меш ся.
5 ५ पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)
Коли ж неправда наша Божу правду викликав, що скажемо? Хиба неправеден Бог, що посилав кару? (яко чоловік глаголю.)
6 ६ कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील?
Нехай не буде (так). Як же бо мав би Бог судити сьвіт?
7 ७ कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?
Коли бо істина Божа через мрю оману ще побагатшала на славу Його, чого ж іще й менї, яко грішникові, осудженим бути?
8 ८ आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
А не (так тому бути), як нас хулять, і як говорять деякі, нїби ми кажемо, що нумо робити лихе, щоб прийшло добре? Праведний суд на таких.
9 ९ मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.
Що ж? ми луччі? Ніяк (не луччі); попереду бо укорили ми й Жидів і Греків, що вони всі під гріхом,
10 १० पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
яко ж писано: що нема праведного нікого,
11 ११ ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
нема, хто розумів би, нема, хто шукав би Бога,
12 १२ ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
всі відхилились, вкупі нікчемні стали; нема, хто робив би добро, нема аж до одного.
13 १३ त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
Гріб відчинений горло їх, язиками своїми підводили; отрута гадюча під губами їх;
14 १४ त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
котрих уста клятьби і гіркости повні;
15 १५ त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
скорі ноги їх проливати кров;
16 १६ विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.
руїна та здиднї на дорогах їх,
17 १७ शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
а дороги мирної не пізнали.
18 १८ त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’
Нема страху Божого перед очима їх.
19 १९ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Знаємо ж, що скільки закон говорить, тим, що під законом, говорить, щоб усякі уста загородились, і винен був увесь сьвіт Богові;
20 २० कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
тим що дїлами закону не справдить ся всяке тїло перед Ним; через закон бо познаннє гріха.
21 २१ पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे.
Тепер же окреме закону правда Божа явилась, сьвідкована від закону й пророків;
22 २२ पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही.
правда ж Бога через віру Ісус. Христову усім і на всїх віруючих-нема бо ріжницї:
23 २३ कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत;
всі бо згрішили, і лишені слави Божої,
24 २४ देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
оправдають ся (ж) дарма благодаттю Його, викупленнєм, що в Христї Ісусї,
25 २५ त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;
котрого предложив Бог на вблагальну жертву через віру в кров Його, щоб з'ясувати правду свою одпущеннєм прежнїх гріхів у довготерпінню Божому,
26 २६ त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.
щоб з'ясувати (кажу) правду свою нинішнього часу, щоб був Він праведний і оправдуючий, хто з віри Ісусової.
27 २७ मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे.
Де ж величаннє? Виключене. Которим законом? учинків? Нї, а законом віри.
28 २८ म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.
Думаємо оце, що чоловік оправ дуєть ся вірою, без учинків по закону.
29 २९ किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे.
Або Жидам Бог тільки, а й не поганам? Так, і поганам;
30 ३० जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.
яко ж бо один Бог, що оправдує обрізаннє з віри і необрізаннє вірою.
31 ३१ तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
То ми оце руйнуємо закон вірою? Нехай не буде (так). Нї, ми утверджуємо закон.