< रोम. 2 >
1 १ तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
เห ปรทูษก มนุษฺย ย: กศฺจน ตฺวํ ภวสิ ตโวตฺตรทานาย ปนฺถา นาสฺติ ยโต ยสฺมาตฺ กรฺมฺมณ: ปรสฺตฺวยา ทูษฺยเต ตสฺมาตฺ ตฺวมปิ ทูษฺยเส, ยตสฺตํ ทูษยนฺนปิ ตฺวํ ตทฺวทฺ อาจรสิฯ
2 २ पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
กินฺเตฺวตาทฺฤคาจาริโภฺย ยํ ทณฺฑมฺ อีศฺวโร นิศฺจิโนติ ส ยถารฺถ อิติ วยํ ชานีม: ฯ
3 ३ तर अशा गोष्टी करणार्यांना दोष लावणार्या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
อเตอว เห มานุษ ตฺวํ ยาทฺฤคาจาริโณ ทูษยสิ สฺวยํ ยทิ ตาทฺฤคาจรสิ ตรฺหิ ตฺวมฺ อีศฺวรทณฺฑาตฺ ปลายิตุํ ศกฺษฺยสีติ กึ พุธฺยเส?
4 ४ किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
อปรํ ตว มนส: ปริวรฺตฺตนํ กรฺตฺตุมฺ อิศฺวรสฺยานุคฺรโห ภวติ ตนฺน พุทฺธฺวา ตฺวํ กึ ตทียานุคฺรหกฺษมาจิรสหิษฺณุตฺวนิธึ ตุจฺฉีกโรษิ?
5 ५ पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
ตถา สฺวานฺต: กรณสฺย กโฐรตฺวาตฺ เขทราหิตฺยาจฺเจศฺวรสฺย นฺยายฺยวิจารปฺรกาศนสฺย โกฺรธสฺย จ ทินํ ยาวตฺ กึ สฺวารฺถํ โกปํ สญฺจิโนษิ?
6 ६ तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.
กินฺตุ ส เอไกกมนุชาย ตตฺกรฺมฺมานุสาเรณ ปฺรติผลํ ทาสฺยติ;
7 ७ म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; (aiōnios )
วสฺตุตสฺตุ เย ชนา ไธรฺยฺยํ ธฺฤตฺวา สตฺกรฺมฺม กุรฺวฺวนฺโต มหิมา สตฺกาโร'มรตฺวญฺไจตานิ มฺฤคยนฺเต เตโภฺย'นนฺตายุ รฺทาสฺยติฯ (aiōnios )
8 ८ परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप.
อปรํ เย ชนา: สตฺยธรฺมฺมมฺ อคฺฤหีตฺวา วิปรีตธรฺมฺมมฺ คฺฤหฺลนฺติ ตาทฺฤศา วิโรธิชนา: โกปํ โกฺรธญฺจ โภกฺษฺยนฺเตฯ
9 ९ संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
อา ยิหูทิโน'นฺยเทศิน: ปรฺยฺยนฺตํ ยาวนฺต: กุกรฺมฺมการิณ: ปฺราณิน: สนฺติ เต สรฺเวฺว ทุ: ขํ ยาตนาญฺจ คมิษฺยนฺติ;
10 १० पण प्रत्येक चांगले करणार्या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
กินฺตุ อา ยิหูทิโน ภินฺนเทศิปรฺยฺยนฺตา ยาวนฺต: สตฺกรฺมฺมการิโณ โลกา: สนฺติ ตานฺ ปฺรติ มหิมา สตฺการ: ศานฺติศฺจ ภวิษฺยนฺติฯ
11 ११ कारण देवाजवळ पक्षपात नाही.
อีศฺวรสฺย วิจาเร ปกฺษปาโต นาสฺติฯ
12 १२ कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
อลพฺธวฺยวสฺถาศาสฺไตฺร ไรฺย: ปาปานิ กฺฤตานิ วฺยวสฺถาศาสฺตฺราลพฺธตฺวานุรูปเสฺตษำ วินาโศ ภวิษฺยติ; กินฺตุ ลพฺธวฺยวสฺถาศาสฺตฺรา เย ปาปานฺยกุรฺวฺวนฺ วฺยวสฺถานุสาราเทว เตษำ วิจาโร ภวิษฺยติฯ
13 १३ कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
วฺยวสฺถาโศฺรตาร อีศฺวรสฺย สมีเป นิษฺปาปา ภวิษฺยนฺตีติ นหิ กินฺตุ วฺยวสฺถาจาริณ เอว สปุณฺยา ภวิษฺยนฺติฯ
14 १४ कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात.
ยโต 'ลพฺธวฺยวสฺถาศาสฺตฺรา ภินฺนเทศียโลกา ยทิ สฺวภาวโต วฺยวสฺถานุรูปานฺ อาจารานฺ กุรฺวฺวนฺติ ตรฺหฺยลพฺธศาสฺตฺรา: สนฺโต'ปิ เต เสฺวษำ วฺยวสฺถาศาสฺตฺรมิว สฺวยเมว ภวนฺติฯ
15 १५ आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.
เตษำ มนสิ สากฺษิสฺวรูเป สติ เตษำ วิตรฺเกษุ จ กทา ตานฺ โทษิณ: กทา วา นิรฺโทษานฺ กฺฤตวตฺสุ เต สฺวานฺตรฺลิขิตสฺย วฺยวสฺถาศาสฺตฺรสฺย ปฺรมาณํ สฺวยเมว ททติฯ
16 १६ देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.
ยสฺมินฺ ทิเน มยา ปฺรกาศิตสฺย สุสํวาทสฺยานุสาราทฺ อีศฺวโร ยีศุขฺรีษฺเฏน มานุษาณามฺ อนฺต: กรณานำ คูฒาภิปฺรายานฺ ธฺฤตฺวา วิจารยิษฺยติ ตสฺมินฺ วิจารทิเน ตตฺ ปฺรกาศิษฺยเตฯ
17 १७ आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस;
ปศฺย ตฺวํ สฺวยํ ยิหูทีติ วิขฺยาโต วฺยวโสฺถปริ วิศฺวาสํ กโรษิ,
18 १८ तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे;
อีศฺวรมุทฺทิศฺย สฺวํ ศฺลาฆเส, ตถา วฺยวสฺถยา ศิกฺษิโต ภูตฺวา ตสฺยาภิมตํ ชานาสิ, สรฺวฺวาสำ กถานำ สารํ วิวึกฺเษ,
19 १९ आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश,
อปรํ ชฺญานสฺย สตฺยตายาศฺจากรสฺวรูปํ ศาสฺตฺรํ มม สมีเป วิทฺยต อโต 'นฺธโลกานำ มารฺคทรฺศยิตา
20 २० अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;
ติมิรสฺถิตโลกานำ มเธฺย ทีปฺติสฺวรูโป'ชฺญานโลเกโภฺย ชฺญานทาตา ศิศูนำ ศิกฺษยิตาหเมเวติ มนฺยเสฯ
21 २१ तर मग जो तू दुसर्याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?
ปรานฺ ศิกฺษยนฺ สฺวยํ สฺวํ กึ น ศิกฺษยสิ? วสฺตุตศฺเจารฺยฺยนิเษธวฺยวสฺถำ ปฺรจารยนฺ ตฺวํ กึ สฺวยเมว โจรยสิ?
22 २२ व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?
ตถา ปรทารคมนํ ปฺรติเษธนฺ สฺวยํ กึ ปรทารานฺ คจฺฉสิ? ตถา ตฺวํ สฺวยํ ปฺรติมาเทฺวษี สนฺ กึ มนฺทิรสฺย ทฺรวฺยาณิ หรสิ?
23 २३ जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?
ยสฺตฺวํ วฺยวสฺถำ ศฺลาฆเส ส ตฺวํ กึ วฺยวสฺถามฺ อวมตฺย เนศฺวรํ สมฺมนฺยเส?
24 २४ कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे.
ศาสฺเตฺร ยถา ลิขติ "ภินฺนเทศินำ สมีเป ยุษฺมากํ โทษาทฺ อีศฺวรสฺย นามฺโน นินฺทา ภวติฯ "
25 २५ कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.
ยทิ วฺยวสฺถำ ปาลยสิ ตรฺหิ ตว ตฺวกฺเฉทกฺริยา สผลา ภวติ; ยติ วฺยวสฺถำ ลงฺฆเส ตรฺหิ ตว ตฺวกฺเฉโท'ตฺวกฺเฉโท ภวิษฺยติฯ
26 २६ म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
ยโต วฺยวสฺถาศาสฺตฺราทิษฺฏธรฺมฺมกรฺมฺมาจารี ปุมานฺ อตฺวกฺเฉที สนฺนปิ กึ ตฺวกฺเฉทินำ มเธฺย น คณยิษฺยเต?
27 २७ आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
กินฺตุ ลพฺธศาสฺตฺรศฺฉินฺนตฺวกฺ จ ตฺวํ ยทิ วฺยวสฺถาลงฺฆนํ กโรษิ ตรฺหิ วฺยวสฺถาปาลกา: สฺวาภาวิกาจฺฉินฺนตฺวโจ โลกาสฺตฺวำ กึ น ทูษยิษฺยนฺติ?
28 २८ कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.
ตสฺมาทฺ โย พาเหฺย ยิหูที ส ยิหูที นหิ ตถางฺคสฺย ยสฺตฺวกฺเฉท: ส ตฺวกฺเฉโท นหิ;
29 २९ कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
กินฺตุ โย ชน อานฺตริโก ยิหูที ส เอว ยิหูที อปรญฺจ เกวลลิขิตยา วฺยวสฺถยา น กินฺตุ มานสิโก ยสฺตฺวกฺเฉโท ยสฺย จ ปฺรศํสา มนุเษฺยโภฺย น ภูตฺวา อีศฺวราทฺ ภวติ ส เอว ตฺวกฺเฉท: ฯ