< रोम. 14 >

1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
Немогаючого ж у вірі приймайте не на розбіраннє думок.
2 कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो.
Один вірує, (що можна) їсти все, а знемогаючий зїллє (нехай) їсть.
3 जो खातो त्याने न खाणार्‍यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्‍यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
Хто їсть, нехай тому, хто не їсть, не докоряє, а хто не їсть, нехай того, хто їсть, не осуджує; Бог бо його прийняв.
4 दुसर्‍याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
Ти хто єси, що судиш чужого слугу? своєму панові стоїть він, або падає. Устоїть же, бо здолїе Бог поставити його.
5 आणि कोणी एखादा दिवस दुसर्‍या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.
Инший шанує (один) день над (другий) день; инший же судить про всякий день Кожен у своїй мислї нехай буде певен.
6 जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.
Хто вважає на день, Господові вважає; і хто не вважає на день, Господеві не вважає. Хто їсть, Господеві їсть, бо дякує Богу; і хто не їсть, Господеві не їсть, та й дякує Богу.
7 कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
Нїхто бо з нас собі не живе, і нїхто собі не вмирає.
8 कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.
Бо коли живемо, Господеві живемо; й коли вмираємо, Господеві вмираємо; то, чи живемо, чи вмираємо, ми Господнї.
9 कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
На се бо Христос і вмер, і воскрес, і ожив, щоб і над мертвими, й над живими панувати.
10 १० मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
Ти ж чого судиш брата твого? або й ти, чого докоряєш брата твого? Усї бо станемо перед судищем Христовим.
11 ११ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
Писано бо: Як живу, глаголе Господь, що передо мною поклонить ся всяке колїно, і всякий язик визнавати ме Бога.
12 १२ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
Тим же кожен э нас за себе позалїк дасть Богу.
13 १३ तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
Оце ж більш один одного не осуджуймо, а лучче розсуджуйте, як би не класти спотикання брату, або поблазнї.
14 १४ मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.
Знаю я і впевнивсь у Христї Ісусї, що нїщо нескверне само собою; тільки, хто думає, що воно скверне, тому й скверне.
15 १५ पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
Коли ж через їжу брат твій сумує, то вже не по любови ходиш. Не погубляй їжею твоєю того, за кого Христос умер.
16 १६ म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.
Нехай же не ганить ся ваше добре.
17 १७ कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
Бо царство Боже не їжа і питте, а правда, і впокій, і радощі в Дусі сьвятім.
18 १८ कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.
Хто бо в сьому служить Христу, той любий Богові і шануваний між людьми.
19 १९ तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
Тому ж отеє побиваймось. за тим, що для впокою і для збудовання спільного.
20 २० अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्‍याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.
Ради їжи не руйнуй діла Божого. Все чисте, тільки лихо чоловікові, що їсть із спотиканнєм.
21 २१ मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
Добре не їсти мясива, анї пити вина, нї (такого), від чого брат твій спотикаєть ся або блазнить ся, або знемогає.
22 २२ तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.
Ти маєш віру? май (її) собі перед Богом. Блажен, хто не осуджує себе в тому, що похваляв.
23 २३ पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.
Хто ж сумнить ся, чи їсти, осудить ся, бо (їсть) не по вірі; все ж, що не по вірі, гріх.

< रोम. 14 >