< रोम. 14 >
1 १ जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
यो जनोऽदृढविश्वासस्तं युष्माकं सङ्गिनं कुरुत किन्तु सन्देहविचारार्थं नहि।
2 २ कोणी असा विश्वास ठेवतो की, आपण सर्वकाही खावे, दुसरा कोणी जो दुर्बळ आहे तो भाजीपाला खातो.
यतो निषिद्धं किमपि खाद्यद्रव्यं नास्ति, कस्यचिज्जनस्य प्रत्यय एतादृशो विद्यते किन्त्वदृढविश्वासः कश्चिदपरो जनः केवलं शाकं भुङ्क्तं।
3 ३ जो खातो त्याने न खाणार्यास तुच्छ लेखू नये; आणि जो खात नाही त्याने खाणार्यास दोष लावू नये; कारण देवाने त्याचा स्वीकार केला आहे.
तर्हि यो जनः साधारणं द्रव्यं भुङ्क्ते स विशेषद्रव्यभोक्तारं नावजानीयात् तथा विशेषद्रव्यभोक्तापि साधारणद्रव्यभोक्तारं दोषिणं न कुर्य्यात्, यस्माद् ईश्वरस्तम् अगृह्लात्।
4 ४ दुसर्याच्या नोकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो आपल्या धन्यापुढे उभा राहील किंवा पडेल. हो, तो स्थिर केला जाईल; कारण धनी त्यास स्थिर करण्यास समर्थ आहे.
हे परदासस्य दूषयितस्त्वं कः? निजप्रभोः समीपे तेन पदस्थेन पदच्युतेन वा भवितव्यं स च पदस्थ एव भविष्यति यत ईश्वरस्तं पदस्थं कर्त्तुं शक्नोति।
5 ५ आणि कोणी एखादा दिवस दुसर्या दिवसाहून अधिक मानतो; दुसरा कोणी सगळे दिवस सारखे मानतो. प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या मनात पूर्ण खातरी होऊ द्यावी.
अपरञ्च कश्चिज्जनो दिनाद् दिनं विशेषं मन्यते कश्चित्तुु सर्व्वाणि दिनानि समानानि मन्यते, एकैको जनः स्वीयमनसि विविच्य निश्चिनोतु।
6 ६ जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.
यो जनः किञ्चन दिनं विशेषं मन्यते स प्रभुभक्त्या तन् मन्यते, यश्च जनः किमपि दिनं विशेषं न मन्यते सोऽपि प्रभुभक्त्या तन्न मन्यते; अपरञ्च यः सर्व्वाणि भक्ष्यद्रव्याणि भुङ्क्ते स प्रभुभक्तया तानि भुङ्क्ते यतः स ईश्वरं धन्यं वक्ति, यश्च न भुङ्क्ते सोऽपि प्रभुभक्त्यैव न भुञ्जान ईश्वरं धन्यं ब्रूते।
7 ७ कारण आपल्यातला कोणीही स्वतःकरता जगत नाही व कोणीही स्वतःकरता मरत नाही.
अपरम् अस्माकं कश्चित् निजनिमित्तं प्राणान् धारयति निजनिमित्तं म्रियते वा तन्न;
8 ८ कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.
किन्तु यदि वयं प्राणान् धारयामस्तर्हि प्रभुनिमित्तं धारयामः, यदि च प्राणान् त्यजामस्तर्ह्यपि प्रभुनिमित्तं त्यजामः, अतएव जीवने मरणे वा वयं प्रभोरेवास्महे।
9 ९ कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
यतो जीवन्तो मृताश्चेत्युभयेषां लोकानां प्रभुत्वप्राप्त्यर्थं ख्रीष्टो मृत उत्थितः पुनर्जीवितश्च।
10 १० मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत.
किन्तु त्वं निजं भ्रातरं कुतो दूषयसि? तथा त्वं निजं भ्रातरं कुतस्तुच्छं जानासि? ख्रीष्टस्य विचारसिंहासनस्य सम्मुखे सर्व्वैरस्माभिरुपस्थातव्यं;
11 ११ कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
यादृशं लिखितम् आस्ते, परेशः शपथं कुर्व्वन् वाक्यमेतत् पुरावदत्। सर्व्वो जनः समीपे मे जानुपातं करिष्यति। जिह्वैकैका तथेशस्य निघ्नत्वं स्वीकरिष्यति।
12 १२ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
अतएव ईश्वरसमीपेऽस्माकम् एकैकजनेन निजा कथा कथयितव्या।
13 १३ तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
इत्थं सति वयम् अद्यारभ्य परस्परं न दूषयन्तः स्वभ्रातु र्विघ्नो व्याघातो वा यन्न जायेत तादृशीमीहां कुर्म्महे।
14 १४ मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे.
किमपि वस्तु स्वभावतो नाशुचि भवतीत्यहं जाने तथा प्रभुना यीशुख्रीष्टेनापि निश्चितं जाने, किन्तु यो जनो यद् द्रव्यम् अपवित्रं जानीते तस्य कृते तद् अपवित्रम् आस्ते।
15 १५ पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
अतएव तव भक्ष्यद्रव्येण तव भ्राता शोकान्वितो भवति तर्हि त्वं भ्रातरं प्रति प्रेम्ना नाचरसि। ख्रीष्टो यस्य कृते स्वप्राणान् व्ययितवान् त्वं निजेन भक्ष्यद्रव्येण तं न नाशय।
16 १६ म्हणून तुम्ही जे चांगले स्वीकारले आहे त्याची निंदा होऊ देऊ नका.
अपरं युष्माकम् उत्तमं कर्म्म निन्दितं न भवतु।
17 १७ कारण खाणे किंवा पिणे ह्यात देवाचे राज्य नाही; पण नीतिमत्त्व, शांती व पवित्र आत्म्यातील आनंद ह्यात आहे.
भक्ष्यं पेयञ्चेश्वरराज्यस्य सारो नहि, किन्तु पुण्यं शान्तिश्च पवित्रेणात्मना जात आनन्दश्च।
18 १८ कारण जो ह्याप्रमाणे ख्रिस्ताची सेवा करतो तो देवाला स्वीकार्य व मनुष्यांनी स्वीकृत केलेला होतो.
एतै र्यो जनः ख्रीष्टं सेवते, स एवेश्वरस्य तुष्टिकरो मनुष्यैश्च सुख्यातः।
19 १९ तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
अतएव येनास्माकं सर्व्वेषां परस्परम् ऐक्यं निष्ठा च जायते तदेवास्माभि र्यतितव्यं।
20 २० अन्नाकरता देवाचे काम तू नष्ट करू नकोस; सर्व गोष्टी खरोखर खाण्यायोग्य आहेत; पण जो मनुष्य दुसर्याला अडखळण करून खातो त्यास ते वाईट आहे.
भक्ष्यार्थम् ईश्वरस्य कर्म्मणो हानिं मा जनयत; सर्व्वं वस्तु पवित्रमिति सत्यं तथापि यो जनो यद् भुक्त्वा विघ्नं लभते तदर्थं तद् भद्रं नहि।
21 २१ मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.
तव मांसभक्षणसुरापानादिभिः क्रियाभि र्यदि तव भ्रातुः पादस्खलनं विघ्नो वा चाञ्चल्यं वा जायते तर्हि तद्भोजनपानयोस्त्यागो भद्रः।
22 २२ तुझ्यात विश्वास आहे, तो तू देवासमोर आपल्याजवळ बाळग. जो स्वतः पसंत केलेल्या गोष्टींत स्वतःला दोषी ठरवीत नाही तो धन्य होय.
यदि तव प्रत्ययस्तिष्ठति तर्हीश्वरस्य गोचरे स्वान्तरे तं गोपय; यो जनः स्वमतेन स्वं दोषिणं न करोति स एव धन्यः।
23 २३ पण जो मनुष्य संशय धरतो त्याने खाल्ले तर तो दोषी ठरतो; कारण ते विश्वासाने खाल्लेले नाही कारण जे विश्वासाने केलेले नाही ते पाप आहे.
किन्तु यः कश्चित् संशय्य भुङ्क्तेऽर्थात् न प्रतीत्य भुङ्क्ते, स एवावश्यं दण्डार्हो भविष्यति, यतो यत् प्रत्ययजं नहि तदेव पापमयं भवति।