< प्रक. 9 >
1 १ मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. (Abyssos )
Beşinci melek borazanını çaldı. Gökten yere düşmüş bir yıldız gördüm. Dipsiz derinliklere açılan kuyunun anahtarı ona verildi. (Abyssos )
2 २ त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. (Abyssos )
Dipsiz derinliklerin kuyusunu açınca, kuyudan büyük bir ocağın dumanı gibi bir duman çıktı. Kuyunun dumanından güneş ve hava karardı. (Abyssos )
3 ३ त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती.
Dumanın içinden yeryüzüne çekirgeler yağdı. Bunlara yeryüzündeki akreplerin gücüne benzer bir güç verilmişti.
4 ४ यांना असे सांगितले होते की, पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या कपाळांवर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र इजा करा.
Çekirgelere yeryüzündeki otlara, herhangi bir bitki ya da ağaca değil de, yalnız alınlarında Tanrı'nın mührü bulunmayan insanlara zarar vermeleri söylendi.
5 ५ त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती.
Bu insanları öldürmelerine değil, beş ay süreyle işkence etmelerine izin verildi. Yaptıkları işkence akrebin insanı soktuğu zaman verdiği acıya benziyordu.
6 ६ त्या दिवसात माणसे मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार नाही, ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल.
O günlerde insanlar ölümü arayacak, ama bulamayacaklar. Ölümü özleyecekler, ama ölüm onlardan kaçacak.
7 ७ टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या घोड्यांसारखे होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते.
Çekirgelerin görünümü, savaşa hazırlanmış atlara benziyordu. Başlarında altın taçlara benzer başlıklar vardı. Yüzleri insan yüzleri gibiydi.
8 ८ त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे होते.
Saçları kadın saçına, dişleri aslan dişine benziyordu.
9 ९ त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता;
Demir zırhlara benzer göğüs zırhları vardı. Kanatlarının sesi savaşa koşan çok sayıda atlı arabanın sesine benziyordu.
10 १० त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे.
Akrebinkine benzer kuyrukları ve iğneleri vardı. Kuyruklarında, insanlara beş ay zarar verecek güce sahiptiler.
11 ११ अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे. (Abyssos )
Başlarında kral olarak dipsiz derinliklerin meleği vardı. Bu meleğin İbranice adı Avaddon, Grekçe adıysa Apolyon'dur. (Abyssos )
12 १२ पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
Birinci “vay” geçti, işte bundan sonra iki “vay” daha geliyor.
13 १३ मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली.
Altıncı melek borazanını çaldı. Tanrı'nın önündeki altın sunağın dört boynuzundan gelen bir ses işittim.
14 १४ ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या फरात नदीजवळ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड.
Ses, elinde borazan olan altıncı meleğe, “Büyük Fırat Irmağı'nın yanında bağlı duran dört meleği çöz” dedi.
15 १५ तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले.
Tam o saat, o gün, o ay, o yıl için hazır tutulan dört melek, insanların üçte birini öldürmek üzere çözüldü.
16 १६ घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.
Atlı ordularının sayısı iki yüz milyondu, sayılarını duydum.
17 १७ त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती.
Görümümde atları ve binicilerini gördüm. Ateş, gökyakut ve kükürt renginde göğüs zırhları kuşanmışlardı. Atların başları aslan başına benziyordu. Ağızlarından ateş, duman, kükürt fışkırıyordu.
18 १८ त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला,
İnsanların üçte biri bunların ağzından fışkıran ateş, duman ve kükürtten, bu üç beladan öldü.
19 १९ कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात.
Atların gücü ağızlarında ve kuyruklarındadır. Yılanı andıran kuyruklarının başıyla zarar verirler.
20 २० त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही
Geriye kalan insanlar, yani bu belalardan ölmemiş olanlar, kendi elleriyle yaptıkları putlardan dönüp tövbe etmediler. Cinlere ve göremeyen, işitemeyen, yürüyemeyen altın, gümüş, tunç, taş, tahta putlara tapmaktan vazgeçmediler.
21 २१ आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.
Adam öldürmekten, büyü, fuhuş, hırsızlık yapmaktan da tövbe etmediler.