< प्रक. 5 >

1 मग मी, जो राजासनावर बसला होता त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के मारून बंद केली होती.
E eu vi na [mão] direita do que estava sentado sobre o trono um livro escrito por dentro e por fora, selado com sete selos.
2 आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?”
E vi um forte anjo, proclamando em alta voz: “Quem é digno de abrir o livro, e soltar seus selos?”
3 परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता.
E ninguém no céu, nem na terra podia abrir o livro, nem olhar [para] ele.
4 ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले.
E eu chorei muito, porque ninguém foi achado digno de abrir o livro, nem de o ler, nem olhar [para] ele.
5 परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.”
E um dos anciãos me disse: “Não chores; eis que o Leão da tribo de Judá, a raiz de Davi, venceu, para abrir o livro e soltar seus sete selos.”
6 राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी कोकरा उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.
E eu olhei, e eis que no meio do trono, e dos quatro animais, e no meio dos anciãos, um Cordeiro que estava como se tivesse sido morto, e tinha sete chifres, e sete olhos, que são os sete espíritos de Deus enviados para toda a terra.
7 तो गेला आणि त्याने जो, राजासनावर बसला होता, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली.
E ele veio, e tomou o livro da [mão] direita daquele que estava sentado sobre o trono.
8 आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धूपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या प्रार्थना होत्या.
E quando ele tomou o livro, os quatro animais, e os vinte e quatro anciãos se prostraram diante do Cordeiro, tendo cada um harpas, e recipientes de ouro cheios de perfumes, que são as orações dos santos.
9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून देवासाठी माणसे विकत घेतली आहेत.
E eles cantavam um novo cântico, dizendo: “Digno és tu de tomar o livro, e abrir seus selos; porque foste morto, e com o teu sangue para Deus compraste [pessoas], de toda tribo, língua, povo, e nação;
10 १० तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य आणि याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
e para nosso Deus tu as fizeste reis e sacerdotes; e reinarão sobre a terra.”
11 ११ मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.
E eu olhei, e ouvi uma voz de muitos anjos ao redor do trono, e dos animais, e dos anciãos; e o número deles era de centenas de milhões, e milhares de milhares;
12 १२ देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले. जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे.
que diziam em alta voz: “Digno é o Cordeiro que foi morto, de receber poder, riquezas, sabedoria, força, honra, glória, e louvor!”
13 १३ प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” (aiōn g165)
E eu ouvi toda criatura que está no céu, e na terra, e abaixo da terra, e no mar, e todas as coisas que nelas há, dizendo: “Ao que está sentado sobre o trono, e ao Cordeiro, seja o louvor, a honra, a glória, e o poder, para todo o sempre!” (aiōn g165)
14 १४ चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
E os quatro animais diziam: “Amém!” E os anciãos se prostraram e adoraram.

< प्रक. 5 >