< प्रक. 22 +
1 १ नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती.
I ukázal mi potok čistý vody živé, světlý jako křištál, tekoucí z trůnu Božího a Beránkova.
2 २ नदीच्या दोन्ही काठांवर बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ते प्रत्येक महिन्यास आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात,
U prostřed pak rynku jeho a s obou stran potoka bylo dřevo života, přinášející dvanáctero ovoce, na každý měsíc vydávající ovoce své, a lístí své k zdraví národů.
3 ३ त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही; त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील.
A ničeho zlořečeného již více nebude, ale trůn Boží a Beránkův bude v něm, a služebníci jeho sloužiti jemu budou.
4 ४ आणि ते त्याचे मुख पाहतील व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.
A tvář jeho viděti budou, a jméno jeho bude na čelích jejich.
5 ५ त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील. (aiōn )
A noci tam nebude, aniž budou potřebovati svíce, ani světla slunečného; nebo Pán Bůh je osvěcuje, a kralovati budou na věky věků. (aiōn )
6 ६ नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू आहे, त्याने ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या दासांना कळवण्यासाठी आपला दूत पाठविला आहे.”
I řekl mi: Slova tato jsou věrná a pravá, a Pán Bůh svatých proroků poslal anděla svého, aby ukázal služebníkům svým, co se díti musí brzo.
7 ७ “पाहा, मी लवकर येत आहे. या पुस्तकातील संदेशवचनांचे जो पालन करतो, तो धन्य! आहे.”
Aj, přijduť rychle. Blahoslavený, kdož ostříhá slov proroctví knihy této.
8 ८ ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.
Já pak Jan viděl jsem a slyšel tyto věci. A když jsem slyšel a viděl, padl jsem, klaněti se chtěje před nohama anděla toho, kterýž mi tyto věci ukazoval.
9 ९ परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.”
Ale řekl mi: Hleď, abys toho nečinil. Neboť jsem spoluslužebník tvůj a bratří tvých proroků, a těch, kteříž ostříhají slov knihy této. Bohu se klaněj.
10 १० नंतर देवदूत मला म्हणालाः “तू या संदेश वचनावर शिक्का मारून बंद करू नको; काळाबाबतच्या या पुस्तकातील संदेश गुप्त ठेवू नकोस; कारण या गोष्टी घडून येण्याची वेळ आता जवळ आली आहे.
Potom řekl mi: Nezapečeťuj slov proroctví knihy této; neboť jest blízko čas.
11 ११ जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.”
Kdo škodí, škoď ještě; a kdo smrdí, smrď ještě; a kdo jest spravedlivý, ospravedlni se ještě; a svatý posvěť se ještě.
12 १२ “पाहा, मी लवकर येत आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे,
A aj, přijduť brzo, a odplata má se mnou, abych odplatil jednomu každému podlé skutků jeho.
13 १३ मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.
Jáť jsem Alfa i Oméga, počátek i konec, první i poslední.
14 १४ आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले झगे धुतात ते धन्य आहेत.
Blahoslavení, kteříž zachovávají přikázaní jeho, aby měli právo k dřevu života, a aby branami vešli do města.
15 १५ परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”
Vně pak budou psi a čarodějníci, a smilníci, a vražedlníci, a modláři, i každý, kdož miluje a činí lež.
16 १६ “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”
Já Ježíš poslal jsem anděla svého, aby vám svědčil o těchto věcech v církvích. Já jsem kořen a rod Davidův, a hvězda jasná a jitřní.
17 १७ आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.
A Duch i nevěsta řkou: Poď. A kdož slyší, rciž: Přiď. A kdož žízní, přijdiž, a kdo chce, nabeř vody života darmo.
18 १८ या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव त्याच्यावर आणील;
Osvědčujiť pak každému, kdož by slyšel slova proroctví knihy této, jestliže by kdo přidal k těmto věcem, žeť jemu přidá Bůh ran napsaných v knize této.
19 १९ आणि जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही काढून टाकील त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
A jestliže by kdo ujal od slov proroctví tohoto, odejmeť Bůh díl jeho z knihy života, a z města svatého, a z těch věcí, kteréž jsou napsány v knize této.
20 २० जो येशू या गोष्टीविषयी साक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.” आमेन, ये प्रभू येशू, ये.
Takť praví ten, kterýž svědectví vydává o těchto věcech: Jistěť přijdu brzo. Amen. Přijdiž tedy, Pane Ježíši.
21 २१ प्रभू येशूची कृपा देवाच्या सर्व पवित्र लोकांबरोबर असो.
Milost Pána našeho Jezukrista se všechněmi vámi. Amen.