< प्रक. 21 >
1 १ आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता.
Hange nikaona ilunde ipya nihe mpya, kunsoko ilunde lang'wandyo nihe nang'wandyo yakeile, nibahali ekutile hange.
2 २ आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती;
Nikakiona kisale kitakatifu Yerusalemu nempya, naeisimile pihe kupuma kilunde kung'wi Tunda, nuuziipigwe anga ubibi alusi nunoneigwe kunsoko amugoha.
3 ३ आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील
Aenigule luli lukulu kupuma mituntu lautemi ikalunga Goza! Ulikalo lang'wi Tunda lukole niantu, nung'wenso ukikie palung'we nusese. Akutula antu akwe, nung'wenso Itunda akutula nienso hange ukutula Itunda wao.
4 ४ तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”
Ukuapyagula uliholi lehi kupuma mumiho ao, ikakutile angansha hange, ang'wi kuhongelya, ang'wi kukila, ang'wi uwai, imakani akale akeile.
5 ५ तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.”
Nuanso naewikie migulya mituntu lautemi wikalunga, “Goza! Kumatenda imakani mehi kutula mapya.” Aulieye, Andeke ile kunsoko inkani izi yakulukulu nitai.”
6 ६ आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन.
Aumbie, “Imakani ayaite aiakeile! Une ni Alfa hange ne Omega nitangi hange nikwangu. Kuwihe nukuhung'wa inyota kumupa wang'we bila uguli kupuma munjiilyo yamaze naupanga.
7 ७ जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.
Nuanso nuekadula ukumasala aya ehi, hange kutula ni Tunda wakwe, nung'wenso ukutula ng'waane.
8 ८ पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” (Limnē Pyr )
Kuite anga uu niyele kuawa niao, nisha ahuie abepilani, abulagi, agoolyi, alogi, akulya adudu, hange niateele ehi, ikianza kao kikutula milule la moto nuakibiliti nuesonsa. Nanso yeyo nsha akabiile. (Limnē Pyr )
9 ९ मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकऱ्याची नवरी दाखवतो.”
Ung'we nuamalaeka mupungate wikeza kung'wane ung'wi naukete mabakuli mupungate naiizue mapigo mupungate nampelo nukulunga, “Nzuu apa. Kulagila ubibi alusi, musungu nung”wankolo.
10 १० तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.
Hange wikanihola kule ikinkolo kulugulu lukulu hange lulipu hange wikandagiila kisale nikitakatifu, Yerusalemu, ukusima pihe kupuma kilunde kung'wi Tunda.
11 ११ यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.
Yerusalemu aeukete nuukulu nuang'wi Tunda, hange uzaa wakwe aeanga kito niansailo, anga igwe nilakeoo nikiza nikayapisi.
12 १२ तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा वेशी होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे होती,
Aeukete ikiligo ikulu, ulepu aukete milango kumi na mbiili palung'wi niamalaeka kumi na mbeele mumilango itaatu, inkika nakutakama milango itatu, ninkika nakung'weli milango itaatu.
13 १३ पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.
Inkika nakilya milango itatu, inkika nahukuma milango itaatu, ninkika nakutakama milango itaatu, ninkika nakung'weli milango itaatu.
14 १४ आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.
Imakiligo nakisale aeakite emisingi ikumi na mbiili numigulya lakwe aeakole mina kumi na mbiile naalungwa kumi na mbiili nang'wankolo.
15 १५ आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता.
Ung'wi ao nauligitilye nune aukete ugemeeli wamilanga aeizipigwe kuzahabu kunsoko akugemeelya kisale, imelango akwe nimakiligo akwe.
16 १६ ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या.
Ikesale aekeikilwe mukate amilaba; ulepu wakwe aewipyani nuugale wakwe. Augemeeye ikesale kuigemelyi nuamilanga, stadia 12,000 kuulepu ulepu wakwe, ugale, nekimo aiyimpyani.
17 १७ आणि त्याने तटाचे माप घेतले ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले;
Uu uuu augemeeye nikiligo lakwe, ukomu wakwe ae dhiraa 144 kuugeeli nuakiuntu (nuo nuanso gaa ugemeeli nuamalaeka).
18 १८ तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती.
Ikiligo aelezengilwe kuyapisi nikisale nekekete zahabu nenza, anga ekioo nekiza.
19 १९ आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चौथा पाचू,
Imesingi nikiligo aepambilwe kela eaina nigwe lansailo. Nelang'wandyo aeyapisi nelakabiili aeyakuti samawi, nilakataatu ae kalkedon, nilakanne zumaridi.
20 २० पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग.
Nilaakataano sardoniki, nilamutandatu akili, nilamupungate krisolintho, nilamunana zabarajadi nilakenda yakuti namanjano nilikumi krisoproso, nilikumineng'wi hiakintho, nela kumi nambiili amethisto.
21 २१ आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.
Imelango kumi na mbiili ailulu kuminambiili, kila umulango aeuzepigwe kupuma mululu ing'wi. Isale niinino niakisole aezahabu ninza, nigee anga kioo nikiza.
22 २२ आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत.
Singa aemine itekeelo lehi mukati nakisale, kunsoko Itunda numukulu, nutemil iintu yehi nung'wankolo inge itekeelo lakwe.
23 २३ आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे,
Ikesale shangaaekeloilwe anga lyoa ang'wi ng'weli kunsoko akumileka migulya lakwe kunsoko ukulu wang'wi Tunda aeumelikile migulya lakwe nito lakwe ng'waankolo.
24 २४ राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील.
Imahe akugenda kuwelu wakisale kiko. Iatemi amunkumbulu akuleta ukuulu wao mukati akwe.
25 २५ तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र होणारच नाही.
Imilango akwe singa ikilugailwa, imelango namung'wi ikatile anga utiku pang'wanso.
26 २६ त्या राष्ट्रांकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील;
Akuleta ukulu nilikulyo lamahe mukati akwe,
27 २७ तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.
hange kutile nikishapu nikekingila mukate akwe ang'wi wehi nuanso nukituma ikani lamenyala ang'wi uteele singa ukingila, inge wawadu neminaa andekilwe mumbugulu aupanga nikang'wankolo.