< प्रक. 21 >

1 आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता.
And I sawe a newe heven and a newe erth For the fyrst heven and the fyrst erth were vanysshed awaye and there was no more see.
2 आणि मी ती पवित्र नगरी, नवे यरूशलेम, देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून सजविलेल्या वधूप्रमाणे दिसत होती;
And I Iho sawe that holy cite newe Ierusalem come doune from God oute of heven prepared as a bryde garnysshed for hyr husband.
3 आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील
And I herde a grett voyce out of heaven sayinge: beholde the tabernacle of God is with men and he will dwell with the And they shalbe his people and God him sylffe shalbe with the and be their god.
4 तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल; आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; दुःख, आक्रोश, किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या आहेत.”
And God shall wype awaye all teares fro their eyes. And there shalbe nomore deeth nether sorowe nether cryinge nether shall there be eny more payne for the olde thynges are gone.
5 तेव्हा राजासनावर बसलेला म्हणालाः “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत.”
And he that sate apon the seate sayde: Behold I make all thynges newe. And he sayde vnto me: wryte for these wordes are faythfull and true.
6 आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन.
And he sayde vnto me: it is done I am Alpha and Omega the begynnynge and the ende. I will geve to him yt is a thyrst of the well of the water of lyfe fre.
7 जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.
He that overcometh shall inheret all thynges and I will be his God and he shalbe my sonne.
8 पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” (Limnē Pyr g3041 g4442)
But the fearefull and vnbelevynge and the abhominable and murdrers and whormongers and sorcerers and ydolaters and all lyars shall have their parte in the lake which burnyth with fyre and brymstone which is the seconde deth. (Limnē Pyr g3041 g4442)
9 मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकऱ्याची नवरी दाखवतो.”
And there cam vnto me one of the vii. angels which had the vii. vyals full of the vii. laste plages: and talked with me sayinge: come hydder I will shewe the the bryde the lambes wyfe.
10 १० तेव्हा त्याने मला आत्म्याने एका मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरूशलेम देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.
And he caryed me awaye in the sprete to a grett and an hye mountayne and he shewed me the grett cite holy Ierusalem descendinge out of heven fro God
11 ११ यरूशलेमेच्या ठायी देवाचे तेज होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणाऱ्या यास्फे रत्नासारखे होते.
havynge the brightnes of God. And her shynynge was lyke vnto a stone moste precious even a Iaspar cleare as cristall:
12 १२ तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा वेशी होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर नावे लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा वंशजांची नावे होती,
and had walles grett and hye and had xii gates and at the gates xii. angels: and names written which are the xii. trybes of Israell:
13 १३ पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.
on the est parte iii gatis and on the north syde iii gates and to wardes the south iii gates and from the west iii gates:
14 १४ आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.
and the wall of the cite had xii foundacions and in them the names of the lambes. xii. Apostles.
15 १५ आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा बोरू होता.
And he that talked with me had a golden read to measure the cite with all and the gates therof and the wall therof.
16 १६ ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या.
And the cite was bylt iiii. square and the length was as large as the bredth of it and he measured the cite with the rede. xii M. fur longes: and the lenght and the bredth and ye heyth of it were equall.
17 १७ आणि त्याने तटाचे माप घेतले ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले;
And he measured the wall therof. an cxliiii. cubittes: the measure that ye angell had was after the measure that man vseth.
18 १८ तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती.
And the byldinge of the wall of it was of iaspar. And the cite was pure gold lyke vnto cleare glasse
19 १९ आणि नगरीच्या तटाचे पाये अनेक प्रकारचे मोलवान पाषाण लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चौथा पाचू,
and the foundacions of the wall of ye cite was garnisshed with all maner of precious stones The fyrste foundacion was iaspar the seconde saphyre the thyrde a calcedony the fourth an emeralde:
20 २० पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग.
the fyft sardonix: the sixt sardeos: the seventh crysolite the ayght berall: the nynth a topas: the tenth a crysoprasos: the eleventh a iacyncte: the twelfe an amatist.
21 २१ आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.
The xii. gates were xii pearles every gate was of one pearle and the strete of the cite was pure golde as thorowe shynynge glasse.
22 २२ आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत.
And there was no temple therin. For the lord god allmyghty and the lambe are the temple of it
23 २३ आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण देवाचे तेज तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे,
and the cite hath no nede of the sonne nether of the mone to lyghten it. For the bryghtnes of God dyd light it: and the lambe was the light of it.
24 २४ राष्ट्रे तिच्या प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे आपले वैभव तिच्यात आणतील.
And the people which are saved shall walke in the light of it: and the kynges of the erth shall brynge their glory vnto it.
25 २५ तिच्या वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र होणारच नाही.
And ye gates of it are not shut by daye. For there shalbe no nyght there.
26 २६ त्या राष्ट्रांकडून वैभव आणि मान तिच्यात आणतील;
27 २७ तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे प्रवेश करणार नाही पण कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच प्रवेश करता येईल.
And there shall entre into it none vnclene thynge: nether what soever worketh abhominacion: or maketh lyes: but they only which are wrytten in the lambes boke of lyfe.

< प्रक. 21 >