< प्रक. 2 >
1 १ “इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: जो आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत
До ангола Церкви в Ефе́сі напиши: „Оце каже Той, Хто трима́є сім зір у правиці Своїй, Хто ходить серед семи світильників золотих:
2 २ तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
Я знаю діла твої, і працю твою, і твою терпеливі́сть, і що не можеш терпіти лихих, і ви́пробував тих, хто себе називає апо́столами, але ними не є, і знайшов, що фальшиві вони.
3 ३ मला माहित आहे की, तुझ्यात सहनशीलता आहे, माझ्या नावामुळे तू दुःख सहन केले आणि तू थकला नाहीस.
І ти маєш терпіння, і працюва́в для Йме́ння Мого, але не знемігся.
4 ४ तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.
Але маю на тебе, що ти покинув свою першу любов.
5 ५ म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.
Отож, пам'ятай, звідки ти впав, і покайся, і вчинки давніші роби. Коли ж ні, то до тебе прийду́ незаба́ром, і зру́шу твого світильника́ з його місця, якщо не покаєшся.
6 ६ पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाइतांच्या दुष्ट कृत्यांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो.
Але маєш оце, що нена́видиш учинки Николаї́тів, яких і Я нена́виджу.
7 ७ आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
Хто має вухо, хай чує, що Дух промовляє Церква́м: переможцеві дам їсти від дерева життя, яке в раю́ Божім“.
8 ८ स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो
А до ангола Церкви в Смірні напиши: „Оце каже Перший й Останній, що був мертвий й ожив:
9 ९ मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.
Я знаю діла твої, і біду́, і убозтво, — але ти багатий, — і зневагу тих, що говорять про себе, ніби юдеї вони, та ними не є, але вони — зборище сатани.
10 १० जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा मुकुट जे आनंत जीवन आहे ते देईन.
Не бійся того, що маєш страждати! Ось диявол вкидатиме декого з вас до в'язниць, щоб вас ви́пробувати. І будете мати біду́ десять день. Будь вірний до смерти, і Я тобі дам вінця́ життя!
11 ११ पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.
Хто має вухо, хай чує, що́ Дух промовляє Церква́м: переможець не буде пошко́джений від другої смерти“.
12 १२ पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी दुधारी तलवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
А до ангола Церкви в Перга́мі напиши: „Оце каже Той, що має меча обосі́чного:
13 १३ मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Я знаю діла твої, і що де ти живеш, там престол сатани. І трима́єш ти Йме́ння Моє, і ти не відкинувся від віри Моєї навіть за днів, коли в вас, де живе сатана́, був убитий Анти́па, свідок Мій вірний.
14 १४ पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.
Але трохи Я маю на тебе, бо маєш там тих, хто трима́ється науки Валаа́ма, що навчав був Бала́ка покласти спотика́ння перед синами Ізраїля, щоб їли ідольські жертви й розпу́сту чинили.
15 १५ त्याचप्रमाणे निकलाइतांची शिकवण आचरणारे सुद्धा काहीजण तुमच्यामध्ये आहेत.
Так маєш і ти таких, що трима́ються науки Николаїтської так само.
16 १६ म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तलवारीने त्यांच्याशी लढेन.
Тож покайся! Коли ж ні, то до тебе прийду́ незаба́ром, і воюватиму з ними мечем Своїх уст.
17 १७ पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय्य भोजन म्हणजे मान्न्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल, ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.
Хто має вухо, хай чує, що́ Дух промовляє Церква́м: переможцеві дам їсти прихо́вану манну, і дам йому білого каменя, а на камені написане ймення нове́, якого не знає ніхто, — тільки той, хто приймає його“.
18 १८ थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत तो देवाचा पुत्र हे सांगत आहे,
І до ангола Церкви в Тіяти́рах напиши: „Оце каже Син Божий, що має очі Свої, як по́лум'я огняне́, а ноги Його подібні до міді:
19 १९ मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे.
Я знаю діла твої, і любов, і віру, і службу, і твою терпеливість, і останні вчинки твої, що більші за перші.
20 २० परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहेः ईजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
Але маю на тебе, що жінці Єзаве́лі, яка каже, ніби вона пророки́ня, ти попускаєш навчати та зводити рабів Моїх, чинити розпусту та їсти і́дольські жертви.
21 २१ मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही.
І Я дав був їй ча́су, щоб пока́ялася, — та вона не схотіла покаятися в розпусті своїй.
22 २२ पाहा, म्हणून मी तिला अंथरूणावर खिळून टाकीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचार करतात ते जर आपल्या कामांचा पश्चात्ताप करणार नाहीत तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन.
Ось Я кину її на ложе, а тих, що чинять із нею розпусту, у велику біду, коли тільки в учинках своїх не покаються,
23 २३ तर मी तिच्या अनुयायीरूपी मुलांना मरीने ठार मारीन. मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की, जो मने आणि अंतःकरणे पारखतो तो मी आहे. मी तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कामाप्रमाणे प्रतिफळ देईन.
а діти її поб'ю́ смертю. І пізнають усі Церкви́, що Я Той, Хто нирки й серця вивіря́є, і Я кожному з вас дам за вчинками вашими.
24 २४ पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की ज्यास सैतानाच्या खोल गोष्टी असे म्हणतात, त्या गोष्टी ज्यांना माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.
А вам, та іншим, що в Тіяти́рах, що не мають науки цієї, і — як кажуть — не розуміють так зва́них глиби́н сатани́, кажу́: не накладу́ на вас іншого тягара,
25 २५ मी येईपर्यंत जे तुमच्याकडे आहे त्यास बळकटपणे धरून राहा.
тільки те, що ви маєте, трима́йте, аж поки прийду́.
26 २६ जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्यास मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
А переможцеві, і тому́, хто аж до кінця доде́ржує Мої вчинки, Я дам йому вла́ду „над поганами,
27 २७ आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील.
і буде пасти́ їх залізним жезлом; вони, немов гли́няний по́суд, покру́шаться“, як і Я оде́ржав вла́ду від Свого́ Отця,
28 २८ जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मीसुद्धा त्यास देईल. मी त्यास पहाटेचा तारा देईन.
і дам Я йому зо́рю досві́тню.
29 २९ आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
Хто має вухо, хай чує, що́ Дух промовляє Церква́м!“