< प्रक. 18 >
1 १ ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.
Après cela, je vis descendre du ciel un autre ange, qui avait un grand pouvoir. La terre fut éclairée de sa gloire.
2 २ तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, “पडली, ती महान बाबेल पडली आहे!” ती भूतांना वस्ती झाली आहे, सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.
Et il cria avec force et à grande voix, et dit: Elle est tombée, elle est tombée, Babylone la grande, et elle est devenue la demeure des démons, et le repaire de tout esprit immonde, et le repaire de tout oiseau immonde et horrible.
3 ३ कारण तिच्या व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.
Car toutes les nations ont bu du vin de la fureur de sa fornication, et les rois de la terre se sont prostitués avec elle; et les marchands de la terre se sont enrichis de l'abondance de son luxe.
4 ४ मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो माझ्या लोकांनो, तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.
Puis j'entendis une autre voix du ciel, qui disait: Sortez du milieu d'elle, mon peuple; de peur que, participant à ses péchés, vous n'ayez aussi part à ses plaies;
5 ५ कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली.
Car ses péchés sont montés jusqu'au ciel et Dieu s'est souvenu de ses iniquités.
6 ६ तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या; तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता.
Traitez-la comme elle vous a traités, rendez-lui au double ce qu'elle vous a fait. Dans la même coupe où elle vous a versé, versez-lui au double.
7 ७ तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.
Autant elle s'est enorgueillie et s'est plongée dans les délices, autant faites-lui souffrir de tourment et d'affliction, parce qu'elle dit en son cœur: Je suis assise en reine, je ne suis point veuve, et je ne verrai point le deuil.
8 ८ या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील, मरी, शोक आणि दुष्काळ. ती अग्नीने पुरी जळून जाईल; कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव सामर्थ्यशाली आहे.
C'est pourquoi ses plaies, la mort, le deuil et la famine viendront en un même jour, et elle sera consumée par le feu; car le Seigneur Dieu qui la juge, est puissant.
9 ९ “आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता रडतील आणि ऊर बडवतील.
Et les rois de la terre, qui ont commis fornication, et qui ont vécu dans les délices avec elle, la pleureront et se frapperont la poitrine à cause d'elle lorsqu'ils verront la fumée de son embrasement.
10 १० ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, हाय! ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल; कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे!
Ils se tiendront loin, dans la crainte de sa torture, et ils diront: Malheur! malheur! La cité, la grande Babylone, la ville puissante, car sa condamnation est venue en une heure!
11 ११ आणि पृथ्वीचे व्यापारी तिच्याकरता रडतील आणि शोक करतील; कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही.
Et les marchands de la terre pleureront et se lamenteront à son sujet, parce que personne n'achètera plus leurs marchandises:
12 १२ सोन्याचा, रुप्याचा, हिऱ्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे;
Marchandises d'or et d'argent, de pierres précieuses, de perles, de fin lin, de pourpre, de soie, d'écarlate, toute sorte de bois odoriférant, toute sorte de meubles d'ivoire et de bois très précieux, de bronze, de fer et de marbre,
13 १३ दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षरस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व मनुष्यांचे जीव, हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही.
Du cinnamome, des parfums, des essences, de l'encens, du vin, de l'huile, de la fleur de farine, du blé, des bêtes de charge, des brebis, des chevaux, des chariots, des corps, et des âmes d'hommes.
14 १४ आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत; सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत.
Les fruits que désire ton âme se sont éloignés de toi, et toutes les choses délicates et magnifiques sont perdues pour toi; désormais tu ne les retrouveras plus.
15 १५ आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील
Ceux qui vendaient ces choses, qui s'étaient enrichis avec elle, se tiendront loin d'elle, dans la crainte de sa torture, pleurant et se lamentant, et disant:
16 १६ आणि म्हणतील, हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिऱ्यामोत्यांचा साज घालीत असे.
Malheur! malheur! la grande cité, vêtue de fin lin, de pourpre et d'écarlate, parée d'or, de pierreries et de perles! Qu'en une seule heure tant de richesses aient été détruites!
17 १७ एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे तांडेल, गलबतावरचे सगळे लोक आणि खलाशी आणि जितके समुद्रावर पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर उभे राहिले,
Et tous les pilotes, tous ceux qui montent sur les vaisseaux, les matelots, et tous ceux qui trafiquent sur la mer, se tenaient loin,
18 १८ आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?”
Et voyant la fumée de son embrasement, s'écriaient, en disant: Quelle ville était semblable à la grande cité?
19 १९ आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, हाय! ही महान नगरी! समुद्रावर ज्यांची गलबत होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही एका घटकेत उजाड झाली.
Ils jetaient de la poussière sur leurs têtes, et pleurant et se lamentant, ils criaient et disaient: Malheur! malheur! la grande cité, où tous ceux qui avaient des vaisseaux sur mer s'étaient enrichis par son opulence, en une seule heure a été réduite en désert!
20 २० हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास न्याय दिला आहे.
O ciel, réjouis-toi à cause d'elle, ainsi que vous, saints apôtres et prophètes; car Dieu a exercé ses jugements sur elle à cause de vous.
21 २१ मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही.
Alors un ange puissant prit une pierre comme une grande meule, et la jeta dans la mer, en disant: Ainsi sera précipitée avec violence Babylone, la grande ville, et on ne la retrouvera plus.
22 २२ तुझ्यात वीणा वाजविणाऱ्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणाऱ्यांचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही.
Et le son des joueurs de harpe, des musiciens, des joueurs de flûte et des joueurs de trompettes ne sera plus entendu au milieu de toi; aucun artisan, de quelque métier que ce soit, ne s'y trouvera plus; et le bruit de la meule n'y sera plus entendu.
23 २३ आणि तुझ्यात दिव्याचा उजेड. ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.
La lumière de la lampe n'y luira plus, et l'on n'y entendra plus la voix de l'époux et de l'épouse; parce que tes marchands étaient les grands de la terre; parce que toutes les nations ont été séduites par tes enchantements;
24 २४ आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे आणि पृथ्वीवर जे वधलेले त्या सर्वाचे रक्त सापडले.
Et que c'est en elle qu'a été trouvé le sang des prophètes et des saints, et de tous ceux qui ont été mis à mort sur la terre.