< प्रक. 17 >

1 मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो.
Kwasekusiza enye yengilosi eziyisikhombisa ezazilemiganu eyisikhombisa, yasikhuluma lami, isithi kimi: Woza lapha, ngizakutshengisa isigwebo sesifebe esikhulu, esihlezi phezu kwamanzi amanengi,
2 पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.”
afeba laso amakhosi omhlaba, labakhileyo emhlabeni badakwe liwayini lobufebe baso.
3 तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व दहा शिंगे होती.
Yasingithwalela enkangala ngikuMoya; ngasengibona owesifazana ehlezi phezu kwesilo esibomvu, sigcwele amabizo enhlamba, silamakhanda ayisikhombisa lempondo ezilitshumi.
4 त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा व मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक सोन्याचा प्याला होता;
Njalo owesifazana wayembethe okuyibubende lokubomvu, futhi ececiswe ngegolide langamatshe aligugu langamapharele, elenkezo yegolide esandleni sakhe, igcwele amanyala lokungcola kobufebe bakhe,
5 तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई.
njalo ebunzini lakhe kwakulotshiwe ibizo lokuthi: IMFIHLO, IBHABHILONI ELIKHULU, UNINA WEZIFEBE LOWAMANYALA OMHLABA.
6 आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.
Ngasengibona owesifazana edakwe ligazi labangcwele, legazi labafakazi bakaJesu. Sengimbonile ngamangala ngokumangala okukhulu.
7 तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, ज्याला सात डोकी आणि दहा शिंगे आहेत त्या पशूचे रहस्य सांगतो.
Ingilosi yasisithi kimi: Umangalelani? Mina ngizakutshela imfihlo yowesifazana, leyesilo esimthweleyo, esilamakhanda ayisikhombisa lempondo ezilitshumi.
8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. (Abyssos g12)
Isilo, osibonileyo, sasikhona, njalo kasisekho, futhi sizakwenyuka sivela emgodini ongelamkhawulo, sibe sesisiya ekubhujisweni; labakhileyo emhlabeni bazamangala, abamabizo abo ayengabhalwanga egwalweni lwempilo, kusukela ekusekelweni komhlaba, bebona isilo esasikhona, njalo singasekho, lanxa sikhona. (Abyssos g12)
9 इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत;
Nanku ukuqedisisa okulenhlakanipho. Amakhanda ayisikhombisa azintaba eziyisikhombisa owesifazana ahlezi khona phezu kwazo;
10 १० आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल.
futhi angamakhosi ayisikhombisa, amahlanu asewile, lenye ikhona, lenye kayikafiki, njalo nxa isifikile imele ukuhlala isikhatshana.
11 ११ आणि तो जो पशू होता आणि नाही, तो आठवा राजा आहे; तो सातांपासून झालेला आहे; आणि नाशात जात आहे.
Lesilo esasikhona, njalo singasekho, yona-ke ingeyesificaminwembili, njalo ivela kwayisikhombisa, ibisisiya ekubhujisweni.
12 १२ आणि तू बघितलीस ती दहा शिंगे दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो.
Lempondo ezilitshumi, ozibonileyo, zingamakhosi alitshumi, angakemukeli umbuso, kodwa emukele amandla njengamakhosi ngehola linye kanye lesilo.
13 १३ ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.
Wona angqondonye, njalo abela isilo awawo amandla lokubusa.
14 १४ ते कोकऱ्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.”
La azakulwa leWundlu, njalo iWundlu lizawanqoba, ngoba liyiNkosi yamakhosi loMbusi wababusi, labakanye lalo ngababiziweyo labakhethiweyo labathembekileyo.
15 १५ आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत.
Yasisithi kimi: Amanzi owabonileyo, lapho esihlezi khona isifebe, angabantu lamaxuku lezizwe lendimi.
16 १६ आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा द्वेष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील.
Lempondo ezilitshumi, ozibonileyo esilweni, zona zizasizonda isifebe, besezisichitha zisinqunule, zidle inyama yaso, zisitshise ngomlilo.
17 १७ कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे.
Ngoba uNkulunkulu ufakile enhliziyweni zazo ukuthi zenze ingqondo yakhe, lokwenza ngqondonye, lokunika isilo umbuso wazo, kuze kupheleliswe amazwi kaNkulunkulu.
18 १८ आणि जी स्त्री तुला दिसली ती पृथ्वीच्या राजांवर राज्य करणारी मोठी नगरी आहे.
Lowesifazana ombonileyo ungumuzi omkhulu olombuso phezu kwamakhosi omhlaba.

< प्रक. 17 >