< प्रक. 16 >

1 मी परमपवित्रस्थानातून एक मोठी वाणी ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”
Then I heard a loud voice from the sanctuary say to the seven angels, "Go and pour on to the earth the seven bowls of the anger of God."
2 मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले.
So the first angel went away and poured his bowl on to the earth; and it brought a bad and painful sore upon the men who had on them the mark of the Wild Beast and worshipped his statue.
3 नंतर, दुसऱ्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जीव मरण पावले.
The second angel poured his bowl into the sea, and it became blood, like a dead man's blood, and every living creature in the sea died.
4 तिसऱ्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झऱ्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले”
The third angel poured his bowl into the rivers and springs of water, and they became blood.
5 आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, तू जो पवित्र आहेस आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास.
And I heard the angel of the waters say, "Righteous art Thou, who art and wast, the holy One, because Thou hast thus taken vengeance.
6 कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे रक्त पाडले, आणि तू त्यांना रक्त प्यायला दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत.
For they poured out the blood of Thy people and of the Prophets, and in return Thou hast given them blood to drink. And this they deserved."
7 वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.
And I heard a voice from the altar say, "Even so, O Lord God, the Ruler of all, true and righteous are Thy judgments."
8 चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती.
Then the fourth angel poured his bowl on to the sun, and power was given to it to scorch men with fire.
9 लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
And the men were severely burned; and yet they spoke evil of God who had power over the plagues, and they did not repent so as to give Him glory.
10 १० पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य अंधकारमय झाले, आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या;
The fifth angel poured his bowl on to the throne of the Wild Beast; and his kingdom became darkened. People gnawed their tongues because of the pain,
11 ११ त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे स्वर्गीय देवाची निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.
and they spoke evil of the God in Heaven because of their pains and their sores, and did not repent of their misconduct.
12 १२ सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे पाणी आटवले गेले.
The sixth angel poured his bowl into that great river, the Euphrates; and its stream was dried up in order to clear the way for the kings who are to come from the east.
13 १३ आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून बेडकांसारखे तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले.
Then I saw three foul spirits, resembling frogs, issue from the mouth of the Dragon, from the mouth of the Wild Beast, and from the mouth of the false Prophet.
14 १४ कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत.
For they are the spirits of demons working marvels--spirits that go out to control the kings of the whole earth, to assemble them for the battle which is to take place on the great day of God, the Ruler of all.
15 १५ पाहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाही तर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील.
("I am coming like a thief. Blessed is the man who keeps awake and guards his raiment for fear he walk about ill-clad, and his uncomeliness become manifest.")
16 १६ आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले.
And assemble them they did at the place called in Hebrew 'Har-Magedon.'
17 १७ सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.”
Then the seventh angel poured his bowl into the air; and a loud voice came out of the sanctuary from the throne, saying, "Everything is now ready."
18 १८ आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, पृथ्वीवर लोक झाल्यापासून कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला,
Flashes of lightning followed, and voices, and peals of thunder, and an earthquake more dreadful than there had ever been since there was a man upon the earth--so terrible was it, and so great!
19 १९ त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षरसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली.
The great city was split into three parts; the cities of the nations fell; and great Babylon came into remembrance before God, for Him to make her drink from the wine-cup of His fierce anger.
20 २० आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत.
Every island fled away, and there was not a mountain anywhere to be seen.
21 २१ आणि एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.
And heavy hail, that seemed to be a talent in weight, fell from the sky upon the people; and they spoke evil of God on account of the plague of the hail--because the plague of it was exceedingly severe.

< प्रक. 16 >