< प्रक. 13 >

1 आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला. आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
I AP kajinenda pon pik en oror o kilaner man amen pwaradar jan nan madau, me a oje ek o mona iju mia, o mar eijok mier pon oje kan, o ni mona ad en lalaue kan.
2 आणि मी पाहिलेला पशू तो चित्त्यासारखा होता, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला.
Man o, me i kilaner, dueta parder amen, o na a dueta na en par amen, o au a raj on au en laien. O drake ki on i a kelail, o mol a, o a manaman lapalap.
3 त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली; आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली.
O i kilaner mona eu dueta kamekamelar, ari jo, a kamekam motier, a toun jappa karoj puriamuiki man o.
4 आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?”
Irail ari poni on drake, pwe a kapieki man o a kelail, o re poni on man o indinda: Ij me rajon man o? O ij me pan kak mauini on i?
5 आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद शब्द बोलणारे तोंड दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता.
O a pan on i au en juai lapalap, o en lalau eu, o a pan on i, en mimieta jaunipon paeijok riau.
6 त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.
Ari, a jara pajan au a, en lalaue Kot, en laue mar a o tanpaj a jaraui, o irail me kotikot nanlan.
7 आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.
O a kapieki i, en mauini on jaraui kan o kaloe irail edi; o a kapieki i, en kaunda wei karoj, o men liki kan, o lokaia, o kainok kan.
8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील.
O irail karoj, me kaukaujon jappa, pan poni on i karoj, me mar arail jota intinidier nan puk en maur en Jippul, me kamekamelar jan nin tapin jappa.
9 जर कोणाला कान असेल तर तो ऐको.
Meamen jalon a mia, en ron.
10 १० जो कैदेत जायचा तो कैदेत जातो; जो तलवारीने जीवे मारील त्यास तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
Ma amen pan kaloedi, nan pein i pan lodila; o ma amen pan kamekila, kodlaj, nan a pan kamekila kodlaj. Nan iet en jaraui kan ar kononama o ar pojon.
11 ११ आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकऱ्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता.
O i kilaner, amen man pwarado jan nan pwel, oje riau mia, rajon jippul amen, o a kajoi dueta drake amen.
12 १२ तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणाऱ्यांनी नमन करावे असे तो करतो.
O man o kin wia manaman akan karoj dueta men maj mon por en maj a. O a wiada, me toun jappa en poni on man o, me kelailadar jan a kamekam.
13 १३ तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो,
A wiadar kilel lapalap, kamoredi jan lan kijiniai pon jappa mon aramaj akan.
14 १४ आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणाऱ्यांना फसवतो आणि ज्या पशूला तलवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणाऱ्यांस सांगतो.
O a kotaue kin ir, me kaukaujon jappa a kilel akan, me kapi on i, en wiada mon man o, indai on irail, me kaujonta jappa, ren wiai on man o, me a lop en kodlaj mier, ap mauredar, dikedik eu.
15 १५ दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.
O a kapi on i, en kamaureda dikedik en man o, pwe dikedik en man o en pil lokaia, o en wiai on irail, me kan poni dikedik en man, en kamekamela.
16 १६ आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी,
O wiai on karoj, me tik o me lap akan, o kapwapwa kan, o jamama kan, o me maio, o ladu kan, ren wia kilel eu ni pa ar pali maun de ni tam ar.
17 १७ आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये.
Pwe jota amen en kak net de netikila, pwe ir eta, me kileledier, kilelekidi mar en man de wad en mar a.
18 १८ येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.
Iet lolekon. Me lolekon kan en wadokdi mar en man o, pwe a raj on wad en aramaj amen; iet a wad: Wonepuki woneijok

< प्रक. 13 >