< प्रक. 12 >
1 १ आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता.
Og et stort Tegn blev set i Himmelen: En Kvinde, iklædt Solen og med Maanen under sine Fødder og en Krans af tolv Stjerner paa sit Hoved.
2 २ ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.
Og hun var frugtsommelig og skreg i Barnsnød, under Fødselsveer.
3 ३ आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते.
Og et andet Tegn blev set i Himmelen, og se, der var en stor, ildrød Drage, som havde syv Hoveder og ti Horn og paa sine Hoveder syv Kroner.
4 ४ त्याच्या शेपटाने आकाशातील तिसरा हिस्सा तारे खाली ओढून काढले आणि त्यांना पृथ्वीवर पाडले; आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला.
Og dens Hale drog Tredjedelen af Himmelens Stjerner med sig og kastede dem paa Jorden. Og Dragen stod foran Kvinden, som skulde føde, for at sluge hendes Barn, naar hun havde født det.
5 ५ आणि सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले.
Og hun fødte et Drengebarn, som skal vogte alle Folkeslagene med en Jernstav; og hendes Barn blev bortrykket til Gud og til hans Trone.
6 ६ आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
Og Kvinden flyede ud i Ørkenen, hvor hun har et Sted beredt fra Gud, for at man skal ernære hende der eet Tusinde, to Hundrede og tresindstyve Dage.
7 ७ आणि स्वर्गात युद्ध झाले; मिखाएल व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले.
Og der blev en Kamp i Himmelen: Mikael og hans Engle gave sig til at kæmpe imod Dragen, og Dragen kæmpede og dens Engle.
8 ८ पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.
Men de magtede det ikke, og deres Sted fandtes ikke mere i Himmelen.
9 ९ तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Og den store Drage blev nedstyrtet; den gamle Slange, som kaldes Djævelen og Satan, som forfører den hele Verden, blev nedstyrtet paa Jorden, og hans Engle bleve nedstyrtede med ham.
10 १० आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे.
Og jeg hørte en høj Røst i Himmelen sige: Nu er Frelsen og Kraften og Riget blevet vor Guds, og Magten hans Salvedes; thi nedstyrtet er vore Brødres Anklager, som anklagede dem for vor Gud Dag og Nat.
11 ११ त्यांनी कोकऱ्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
Og de have overvundet ham i Kraft af Lammets Blod og i Kraft af deres Vidnesbyrds Ord; og de elskede ikke deres Liv, lige til Døden.
12 १२ म्हणून स्वर्गांनो आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, आनंद करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.
Derfor, fryder eder, I Himle, og I, som bo i dem! Ve Jorden og Havet! thi Djævelen er nedstegen til eder og har stor Vrede, fordi han ved, at han kun har liden Tid.
13 १३ आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला.
Og da Dragen saa, at den var styrtet til Jorden, forfulgte den Kvinden, som havde født Drengebarnet.
14 १४ परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल.
Og den store Ørns tvende Vinger bleve givne Kvinden, for at hun skulde flyve til Ørkenen, til sit Sted, der hvor hun næres en Tid og Tider og en halv Tid, borte fra Slangen.
15 १५ आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले.
Og Slangen spyede Vand som en Flod ud af sin Mund efter Kvinden for at bortskylle hende med Floden.
16 १६ पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली.
Og Jorden kom Kvinden til Hjælp; og Jorden aabnede sin Mund og opslugte Floden, som Dragen havde udspyet af sin Mund.
17 १७ तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;
Og Dragen vrededes paa Kvinden og gik bort for at føre Krig imod de øvrige af hendes Sæd, dem, som holde Guds Bud og have Jesu Vidnesbyrd.