< प्रक. 11 >

1 मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे.
I dano mi trzcinę podobną do pręta. I stanął anioł, mówiąc: Wstań i zmierz świątynię Boga i ołtarz oraz tych, którzy w niej oddają pokłon.
2 पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.
Lecz dziedziniec zewnętrzny świątyni wyłącz i nie mierz go, gdyż został dany poganom. I będą deptać święte miasto przez czterdzieści dwa miesiące.
3 आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”
I dam [władzę] dwóm moim świadkom, którzy będą prorokować przez tysiąc dwieście sześćdziesiąt dni ubrani w wory.
4 हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत.
Oni są dwoma drzewami oliwnymi i dwoma świecznikami, które stoją przed Bogiem ziemi.
5 जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे.
A gdy ktoś chce ich skrzywdzić, ogień wychodzi z ich ust i pożera ich wrogów. Jeśli więc ktoś chciałby ich skrzywdzić, w ten sposób musi być zabity.
6 या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.
Oni mają władzę zamknąć niebo, aby nie padał deszcz za dni ich prorokowania, i mają władzę nad wodami, aby je zamieniać w krew i porazić ziemię wszelkimi plagami, ilekroć zechcą.
7 त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. (Abyssos g12)
A gdy dopełnią swojego świadectwa, bestia, która wychodzi z otchłani, stoczy z nimi walkę i zwycięży ich, i zabije ich. (Abyssos g12)
8 तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.
A ich zwłoki [będą leżeć] na ulicy wielkiego miasta, które duchowo nazywa się Sodomą i Egiptem, gdzie też nasz Pan został ukrzyżowany.
9 आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत.
I [wielu] spośród ludów, plemion, języków i narodów będzie patrzeć na ich zwłoki przez trzy i pół dnia i nie pozwolą złożyć ich zwłok do grobu.
10 १० त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.
A mieszkańcy ziemi będą się cieszyć i radować z ich powodu. I będą sobie nawzajem posyłać podarunki, bo ci dwaj prorocy dręczyli mieszkańców ziemi.
11 ११ आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले.
A po trzech i pół dnia duch życia od Boga wszedł w nich i stanęli na nogach, a wielki strach padł na tych, którzy na nich patrzyli.
12 १२ आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैऱ्यांनी त्यांना पाहिले.
Potem usłyszeli donośny głos z nieba mówiący: Wstąp tutaj. I wstąpili do nieba w obłoku, a ich nieprzyjaciele patrzyli na nich.
13 १३ आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले.
W tej godzinie nastąpiło wielkie trzęsienie ziemi i zawaliła się dziesiąta część miasta, i zginęło w trzęsieniu ziemi siedem tysięcy ludzi, a pozostali przerazili się i oddali chwałę Bogu nieba.
14 १४ दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
Minęło drugie „biada”, a oto nadchodzi szybko trzecie „biada”.
15 १५ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. (aiōn g165)
I zatrąbił siódmy anioł, i odezwały się donośne głosy w niebie mówiące: Królestwa świata stały się [królestwami] naszego Pana i jego Chrystusa i będzie królować na wieki wieków. (aiōn g165)
16 १६ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले
A dwudziestu czterech starszych, którzy siedzą przed Bogiem na swoich tronach, upadło na twarze i oddało Bogu pokłon;
17 १७ हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.
Mówiąc: Dziękujemy tobie, Panie Boże Wszechmogący, który jesteś i który byłeś, i który masz przyjść, że wziąłeś swą potężną moc i objąłeś królestwo.
18 १८ राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
I rozgniewały się narody, i nadszedł twój gniew i czas osądzenia umarłych, i oddania zapłaty twoim sługom prorokom i świętym oraz tym, którzy się boją twego imienia, małym i wielkim, i zniszczenia tych, którzy niszczą ziemię.
19 १९ तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.
Potem otworzyła się świątynia Boga w niebie i arka jego przymierza ukazała się w jego świątyni, i nastąpiły błyskawice, głosy, grzmoty, trzęsienia ziemi i wielki grad.

< प्रक. 11 >