< प्रक. 11 >
1 १ मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे.
AND there was given to me a reed, like a staff; and the angel stood, saying, Arise, measure the temple of Aloha, and the altar, and them who worship therein;
2 २ पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील.
and the court which is without the temple cast out, and do not measure it, because it is given to the Gentiles, and the holy city shall be trodden down, MONTHS FORTY AND TWO.
3 ३ आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.”
And I will give my two witnesses, and they shall prophesy, DAYS A THOUSAND AND TWO HUNDRED AND SIXTY, clothed in sackcloth.
4 ४ हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत.
These are the two olive (trees) and two candlesticks which before the Lord of the earth do stand.
5 ५ जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे.
And if a man willeth to wound them, fire cometh forth from their mouth, and devoureth their adversaries. And if a man willeth to wound (them), thus must he be killed.
6 ६ या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.
These have power to shut heaven, that rain it may not rain in those days; and power have they over the waters, to turn them into blood, and to smite the earth with every plague as many times as they will.
7 ७ त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. (Abyssos )
And when they shall have completed their testimony, the beast of prey, which ascended from the abyss, will make war against them, and overcome them, (Abyssos )
8 ८ तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील.
and their dead bodies (will be) upon the wide street of the great city, which is called, spiritually, Sedum, and Metsreen, where also our Lord hath been crucified.
9 ९ आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत.
And of the peoples and tribes and nations and tongues, seeing their dead bodies days three and a half, will not suffer them to be laid in the tomb.
10 १० त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.
And they who dwell upon earth will rejoice over them and be gratified, and will send gifts to one another, because these two prophets tormented them who dwell upon earth.
11 ११ आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले.
And after those three days and a half, the spirit of life from Aloha entered into them, and they arose upon their feet. And great fear fell upon them who saw them.
12 १२ आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैऱ्यांनी त्यांना पाहिले.
And they heard a great voice from heaven, saying to them, Ascend hither. And they ascended to heaven in a cloud, and their adversaries beheld them.
13 १३ आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले.
And in that hour there was a great movement; and one of ten of the city fell; and there were killed in the movement the names of men seven thousand. And they who were left were made afraid, and gave glory to Aloha.
14 १४ दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
That second woe hath passed. Behold, the third woe cometh quickly.
15 १५ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. (aiōn )
And the Seventh angel sounded. And there were voices and thunders, saying, The kingdom of the world Is of our Lord, and of his Meshiha; And he will reign for ever and ever! (aiōn )
16 १६ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले
And the twenty and four presbyters who were before the throne of Aloha, who were sitting upon their thrones, fell upon their faces and worshipped,
17 १७ हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.
saying, We give thanks to thee, Lord God omnipotent, Who art, and who wast; Because thou hast taken thy great power, And hast reigned.
18 १८ राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.
And the nations were angry; But thy wrath is come, And the time of the dead, That they should be avenged; And to give reward to thy servants, To the prophets, and to the saints, And to them who fear thy Name, To the small and to the great; And to destroy them who have destroyed the earth.
19 १९ तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.
And the temple of Aloha was opened in heaven; and there was seen the ark of his covenant in his temple. And there were lightnings, and thunderings, and voices, and movement, and great hail.