< प्रक. 10 >

1 मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते,
לאחר מכן ראיתי מלאך גיבור אחר יורד מן השמים. הוא היה עטוף בענן, ומעל ראשו מעין קשת; פניו זרחו כשמש, רגליו דמו לעמודי אש
2 त्याच्याहाती एक उघडलेली लहानशी गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला;
ובידו החזיק ספר קטן פתוח. רגלו הימנית דרכה על הארץ,
3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.
והוא קרא קריאה אדירה כשאגת אריה. בתגובה לקריאתו הרימו שבעת הרעמים את קולם והחלו לדבר.
4 त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.
בשעה שדיברו שבעת הרעמים רציתי לכתוב את דבריהם, אך שמעתי קול מן השמים שציווה עלי:”דברי הרעמים הם סוד. אל תעלה אותם על הנייר!“
5 ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,
המלאך הגיבור, שראיתיו עומד על הים ועל הארץ, הרים את יד ימינו כלפי השמים
6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही; (aiōn g165)
ונשבע בשמו של החי לנצח, האלוהים אשר ברא את השמים, הארץ, הים ואת כל אשר בהם:”לא יהיה עיכוב נוסף! (aiōn g165)
7 परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांना जाहीर केल्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.
בימי תקיעת המלאך השביעי בשופרו, כאשר יחל לתקוע, יתגלה סודו של אלוהים, כפי שבישר לעבדיו הנביאים.“
8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे.
הקול אשר שמעתי מן השמים דיבר אלי שנית:”לך, קח את הספר הקטן ופתוח מיד המלאך שעומד על הים ועל הארץ.“
9 तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.”
ניגשתי אליו וביקשתי ממנו את הספר.”קח ואכול אותו“, אמר לי המלאך.”בפיך יהיה טעמו כדבש, אך לאחר שתבלע אותו הוא יהיה מר בבטנך!“
10 १० तेव्हा मी देवदूताच्या हातातून ती लहान गुंडाळी घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.
לקחתי את הספר מהמלאך ואכלתי אותו. בפי היה טעמו כדבש, אך לאחר שבלעתי אותו כאבה בטני וחשתי במרירות.
11 ११ तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.
”עליך לשוב ולנבא על ארצות, עמים, שבטים, שפות ומלכים רבים“, אמר אלי המלאך.

< प्रक. 10 >