< स्तोत्रसंहिता 99 >

1 परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
יְהוָ֣ה מָ֭לָךְ יִרְגְּז֣וּ עַמִּ֑ים יֹשֵׁ֥ב כְּ֝רוּבִ֗ים תָּנ֥וּט הָאָֽרֶץ׃
2 सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
יְ֭הוָה בְּצִיֹּ֣ון גָּדֹ֑ול וְרָ֥ם ה֝֗וּא עַל־כָּל־הָֽעַמִּֽים׃
3 ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.
יֹוד֣וּ שִׁ֭מְךָ גָּדֹ֥ול וְנֹורָ֗א קָדֹ֥ושׁ הֽוּא׃
4 राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
וְעֹ֥ז מֶלֶךְ֮ מִשְׁפָּ֪ט אָ֫הֵ֥ב אַ֭תָּה כֹּונַ֣נְתָּ מֵישָׁרִ֑ים מִשְׁפָּ֥ט וּ֝צְדָקָ֗ה בְּיַעֲקֹ֤ב ׀ אַתָּ֬ה עָשִֽׂיתָ׃
5 परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.
רֹֽומְמ֡וּ יְה֘וָ֤ה אֱלֹהֵ֗ינוּ וְֽ֭הִשְׁתַּחֲווּ לַהֲדֹ֥ם רַגְלָ֗יו קָדֹ֥ושׁ הֽוּא׃
6 त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
מֹ֘שֶׁ֤ה וְאַהֲרֹ֨ן ׀ בְּֽכֹהֲנָ֗יו וּ֭שְׁמוּאֵל בְּקֹרְאֵ֣י שְׁמֹ֑ו קֹרִ֥אים אֶל־יְ֝הוָ֗ה וְה֣וּא יַעֲנֵֽם׃
7 तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
בְּעַמּ֣וּד עָ֭נָן יְדַבֵּ֣ר אֲלֵיהֶ֑ם שָׁמְר֥וּ עֵ֝דֹתָ֗יו וְחֹ֣ק נָֽתַן־לָֽמֹו׃
8 हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.
יְהוָ֣ה אֱלֹהֵינוּ֮ אַתָּ֪ה עֲנִ֫יתָ֥ם אֵ֣ל נֹ֭שֵׂא הָיִ֣יתָ לָהֶ֑ם וְ֝נֹקֵ֗ם עַל־עֲלִילֹותָֽם׃
9 परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
רֹֽומְמ֡וּ יְה֘וָ֤ה אֱלֹהֵ֗ינוּ וְ֭הִֽשְׁתַּחֲווּ לְהַ֣ר קָדְשֹׁ֑ו כִּֽי־קָ֝דֹ֗ושׁ יְהוָ֥ה אֱלֹהֵֽינוּ׃

< स्तोत्रसंहिता 99 >