< स्तोत्रसंहिता 99 >
1 १ परमेश्वर राज्य करतो; राष्ट्रे कंपित होवोत. तो करुबांच्यावर विराजमान आहे; पृथ्वी थरथर कापो.
耶和华作王;万民当战抖! 他坐在二基路伯上,地当动摇。
2 २ सियोनात परमेश्वर महान आहे; तो सर्व राष्ट्रांच्यावर उंच आहे.
耶和华在锡安为大; 他超乎万民之上。
3 ३ ते तुझे महान आणि भयचकीत करणाऱ्या नावाची स्तुती करोत. तो पवित्र आहे.
他们当称赞他大而可畏的名; 他本为圣!
4 ४ राजा बलवान आहे आणि तो न्यायप्रिय आहे. तू सरळपणा स्थापिला आहे; तू याकोबात न्याय व निती अस्तित्वात आणली आहेस.
王有能力,喜爱公平,坚立公正, 在雅各中施行公平和公义。
5 ५ परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पदासनाजवळ त्याची उपासना करा. तो पवित्र आहे.
你们当尊崇耶和华—我们的 神, 在他脚凳前下拜。 他本为圣!
6 ६ त्याच्या याजकामध्ये मोशे आणि अहरोन हे होते, आणि त्यास प्रार्थना करणाऱ्यांपैकी शमुवेल हा होता. त्यांने परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.
在他的祭司中有摩西和亚伦; 在求告他名的人中有撒母耳。 他们求告耶和华,他就应允他们。
7 ७ तो त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा आणि त्याचे नियम पाळले.
他在云柱中对他们说话; 他们遵守他的法度和他所赐给他们的律例。
8 ८ हे परमेश्वरा, आमच्या देवा, तू त्यांना उत्तर दिलेस. तू त्यांना क्षमा करणारा देव आहेस तरी त्यांच्या पापमय कृत्याबद्दल त्यांना शिक्षा करीत होतास.
耶和华—我们的 神啊,你应允他们; 你是赦免他们的 神, 却按他们所行的报应他们。
9 ९ परमेश्वर, आपला देव ह्याची स्तुती करा, आणि त्याच्या पवित्र डोंगरावर उपासना करा, कारण परमेश्वर आमचा देव पवित्र आहे.
你们要尊崇耶和华—我们的 神, 在他的圣山下拜, 因为耶和华—我们的 神本为圣!