< स्तोत्रसंहिता 98 >
1 १ परमेश्वरास नवीन गीत गा, कारण त्याने आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने आणि आपल्या पवित्र बाहूने आम्हास विजय दिला आहे.
Psaume à David (de David) lui-même.
2 २ परमेश्वराने आपले तारण कळवले आहे; त्याने सर्व राष्ट्रांच्यासमोर आपले न्यायीपण उघडपणे दाखवले आहे.
Le Seigneur a fait connaître son salut: en présence des nations, il a révélé sa justice.
3 ३ त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली; पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
Il s’est souvenu de sa miséricorde et de sa vérité en faveur de la maison d’Israël.
4 ४ अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने आणि आनंदाने गा, स्तुतिगायन करा.
Poussez des cris de joie vers Dieu, ô terre toute entière, chantez, et exultez, et jouez du psaltérion.
5 ५ परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा, वीणेवर मधुर स्वराने गायन करा.
Chantez le Seigneur sur une harpe; sur une harpe, en y mêlant un chant de psaume;
6 ६ कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने, परमेश्वर राजासमोर आनंदाने जयघोष करा.
Sur des trompettes battues au marteau, et au son d’une trompette de corne.
7 ७ समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत, जग व त्यामध्ये राहणारे हर्षनाद करोत.
Que la mer soit agitée et sa plénitude, de même que le globe des terres et ceux qui y habitent.
8 ८ नद्या टाळ्या वाजवोत, आणि पर्वत हर्षनाद करोत.
Les fleuves applaudiront de la main, comme aussi les montagnes exulteront
9 ९ परमेश्वर पृथ्वीचा न्याय करण्यास येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा आणि सरळपणाने राष्ट्रांचा न्याय करील.
À la présence du Seigneur, parce qu’il vient juger la terre.