< स्तोत्रसंहिता 97 >

1 परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो. अनेक द्वीपसमूह आनंदित होवो.
RAB egemenlik sürüyor, coşsun yeryüzü, Bütün kıyı halkları sevinsin!
2 ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत. निती व न्याय त्याच्या सिंहासनाचा पाया आहेत.
Bulut ve zifiri karanlık sarmış çevresini, Doğruluk ve adalettir tahtının temeli.
3 अग्नी त्याच्यापुढे चालतो, आणि प्रत्येक बाजूने त्याच्या शत्रूंना नष्ट करून टाकतो.
Ateş yürüyor O'nun önünde, Düşmanlarını yakıyor çevrede.
4 त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले; पृथ्वी हे पाहून थरथर कापली.
Şimşekleri dünyayı aydınlatır, Yeryüzü görüp titrer.
5 परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणासारखे वितळले.
Dağlar balmumu gibi erir, RAB'bin, bütün yeryüzünün Rab'bi önünde.
6 आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला, आणि सर्व राष्ट्रांनी त्याचे वैभव पाहिले.
Gökler O'nun doğruluğunu duyurur, Bütün halklar görkemini görür.
7 जे कोरीव मूर्तीची पूजा करतात, जे मूर्तीचा अभिमान बाळगतात ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देवहो! त्याच्यासमोर नमन करा.
Utansın puta tapanlar, Değersiz putlarla övünenler! RAB'be tapın, ey bütün ilahlar!
8 सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली, कारण हे परमेश्वरा, तुझ्या न्यायामुळे यहूदाच्या नगरांनी आनंद केला.
Siyon seviniyor yargılarını duyunca, ya RAB, Yahuda kentleri coşuyor.
9 कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस. तू सर्व देवापेक्षा खूपच उंचावलेला आहेस.
Çünkü sensin, ya RAB, bütün yeryüzünün en yücesi, Bütün ilahların üstündesin, çok ulusun.
10 १० जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करतो, आणि तो त्यास दुष्टांच्या हातातून सोडवतो.
Ey sizler, RAB'bi sevenler, kötülükten tiksinin. O sadık kullarının canını korur, Onları kötülerin elinden kurtarır.
11 ११ नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
Doğrulara ışık, Temiz yüreklilere sevinç saçar.
12 १२ अहो नितीमानांनो, परमेश्वराठायी आनंदी व्हा. त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद द्या.
Ey doğrular, RAB'de sevinç bulun, Kutsallığını anarak O'na şükredin!

< स्तोत्रसंहिता 97 >