< स्तोत्रसंहिता 96 >

1 अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
שִׁירוּ לַיהוָה שִׁיר חָדָשׁ שִׁירוּ לַיהוָה כָּל־הָאָֽרֶץ׃
2 परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
שִׁירוּ לַיהוָה בָּרֲכוּ שְׁמוֹ בַּשְּׂרוּ מִיּֽוֹם־לְיוֹם יְשׁוּעָתֽוֹ׃
3 राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
סַפְּרוּ בַגּוֹיִם כְּבוֹדוֹ בְּכָל־הָֽעַמִּים נִפְלְאוֹתָֽיו׃
4 कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
כִּי גָדוֹל יְהוָה וּמְהֻלָּל מְאֹד נוֹרָא הוּא עַל־כָּל־אֱלֹהִֽים׃
5 कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
כִּי ׀ כָּל־אֱלֹהֵי הָעַמִּים אֱלִילִים וַֽיהוָה שָׁמַיִם עָשָֽׂה׃
6 वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
הוֹד־וְהָדָר לְפָנָיו עֹז וְתִפְאֶרֶת בְּמִקְדָּשֽׁוֹ׃
7 अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
הָבוּ לַיהוָה מִשְׁפְּחוֹת עַמִּים הָבוּ לַיהוָה כָּבוֹד וָעֹֽז׃
8 परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
הָבוּ לַיהוָה כְּבוֹד שְׁמוֹ שְׂאֽוּ־מִנְחָה וּבֹאוּ לְחַצְרוֹתָֽיו׃
9 पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
הִשְׁתַּחֲווּ לַיהוָה בְּהַדְרַת־קֹדֶשׁ חִילוּ מִפָּנָיו כָּל־הָאָֽרֶץ׃
10 १० राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
אִמְרוּ בַגּוֹיִם ׀ יְהוָה מָלָךְ אַף־תִּכּוֹן תֵּבֵל בַּל־תִּמּוֹט יָדִין עַמִּים בְּמֵישָׁרִֽים׃
11 ११ आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
יִשְׂמְחוּ הַשָּׁמַיִם וְתָגֵל הָאָרֶץ יִֽרְעַם הַיָּם וּמְלֹאֽוֹ׃
12 १२ शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
יַעֲלֹז שָׂדַי וְכָל־אֲשֶׁר־בּוֹ אָז יְרַנְּנוּ כָּל־עֲצֵי־יָֽעַר׃
13 १३ सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
לִפְנֵי יְהוָה ׀ כִּי בָא כִּי בָא לִשְׁפֹּט הָאָרֶץ יִשְׁפֹּֽט־תֵּבֵל בְּצֶדֶק וְעַמִּים בֶּאֱמוּנָתֽוֹ׃

< स्तोत्रसंहिता 96 >