< स्तोत्रसंहिता 96 >
1 १ अहो, परमेश्वरास नवीन गीत गा; हे सर्व पृथ्वी, परमेश्वराचे गुणगान कर.
Zpívejte Hospodinu píseň novou, zpívej Hospodinu všecka země.
2 २ परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या; दिवसेंदिवस त्याच्या तारणाची घोषणा करा.
Zpívejte Hospodinu, dobrořečte jménu jeho, zvěstujte den po dni spasení jeho.
3 ३ राष्ट्रात त्याचे गौरव, त्याच्या आश्चर्यकारक कृत्यांची सर्व राष्ट्रात जाहीर करा.
Vypravujte mezi národy slávu jeho, mezi všemi lidmi divy jeho.
4 ४ कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे. सर्व दुसऱ्या देवांपेक्षा त्याचे भय धरणे योग्य आहे.
Nebo veliký Hospodin, a vší chvály hodný, i hrozný jest nade všecky bohy.
5 ५ कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.
Všickni zajisté bohové národů jsou modly, ale Hospodin nebesa učinil.
6 ६ वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत. सामर्थ्य आणि सौंदर्य त्याच्या पवित्रस्थानी आहेत.
Sláva a důstojnost před ním, síla i okrasa v svatyni jeho.
7 ७ अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा आणि त्याचे सामर्थ्य सांगा.
Vzdejte Hospodinu čeledi národů, vzdejte Hospodinu čest i moc.
8 ८ परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या.
Vzdejte Hospodinu čest jména jeho, přineste dary, a vejděte do síňcí jeho.
9 ९ पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा. हे सर्व पृथ्वी, त्याच्यापुढे कंपायमान हो.
Sklánějte se Hospodinu v okrase svatosti, boj se oblíčeje jeho všecka země.
10 १० राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो. जगसुद्धा स्थिर स्थापिलेले आहे; ते हलविता येणे अशक्य आहे. तो सरळपणे लोकांचा न्याय करील.
Rcete mezi pohany: Hospodin kraluje, a že i okršlek zemský upevněn bude, tak aby se nepohnul, a že souditi bude lidi spravedlivě.
11 ११ आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो; समुद्र आणि त्यातील सर्वकाही गर्जना करोत.
Rozveseltež se nebesa, a plésej země, zvuč moře, i což v něm jest.
12 १२ शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत. मग जंगलातील सर्व वृक्ष आनंदाने गजर करतील.
Plésej pole a vše, což na něm, tehdáž ať prozpěvuje všecko dříví lesní,
13 १३ सगळी निर्मिती परमेश्वरापुढे आनंद करो, कारण तो येत आहे; पृथ्वीचा न्याय करायला तो येत आहे; तो न्यायीपणाने जगाचा व त्याच्या सत्यतेने लोकांचा न्याय करील.
Před tváří Hospodina; neboť se béře, béře se zajisté, aby soudil zemi. Budeť souditi okršlek světa v spravedlnosti, a národy v pravdě své.