< स्तोत्रसंहिता 95 >
1 १ याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
오라! 우리가 여호와께 노래하며 우리 구원의 반석을 향하여 즐거이 부르자
2 २ उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
우리가 감사함으로 그 앞에 나아가며 시로 그를 향하여 즐거이 부르자
3 ३ कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
대저 여호와는 크신 하나님이시요 모든 신 위에 크신 왕이시로다
4 ४ त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
땅의 깊은 곳이 그 위에 있으며 산들의 높은 것도 그의 것이로다
5 ५ समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
바다가 그의 것이라 그가 만드셨고 육지도 그의 손이 지으셨도다
6 ६ याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
오라! 우리가 굽혀 경배하며 우리를 지으신 여호와 앞에 무릎을 꿇자
7 ७ कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
대저 저는 우리 하나님이시요, 우리는 그의 기르시는 백성이며 그 손의 양이라 너희가 오늘날 그 음성 듣기를 원하노라
8 ८ मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,
이르시기를 너희는 므리바에서와 같이 또 광야 맛사의 날과 같이 너희 마음을 강퍅하게 말지어다
9 ९ तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
그 때에 너희 열조가 나를 시험하며 나를 탐지하고 나의 행사를 모았도다
10 १० चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.
내가 사십년을 그 세대로 인하여 근심하여 이르기를 저희는 마음이 미혹된 백성이라 내 도를 알지 못한다 하였도다
11 ११ म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.
그러므로 내가 노하여 맹세하기를 저희는 내 안식에 들어오지 못하리라 하였도다