< स्तोत्रसंहिता 95 >

1 याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू; आपल्या तारणाचा खडक त्याचा हर्षाने जयजयकार करू.
来啊,我们要向耶和华歌唱, 向拯救我们的磐石欢呼!
2 उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू; स्तुतीचे स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
我们要来感谢他, 用诗歌向他欢呼!
3 कराण परमेश्वर महान देव आहे आणि सर्व देवांहून तो श्रेष्ठ महान राजा आहे.
因耶和华为大 神, 为大王,超乎万神之上。
4 त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत; पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहेत.
地的深处在他手中; 山的高峰也属他。
5 समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला, आणि त्याच्या हाताने कोरडी भूमी घडवली गेली.
海洋属他,是他造的; 旱地也是他手造成的。
6 याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्यास नमन करू;
来啊,我们要屈身敬拜, 在造我们的耶和华面前跪下。
7 कारण तो आपला देव आहे, आणि आपण त्याच्या कुरणातील लोक आणि त्याच्या हातातील मेंढरे आहोत. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.
因为他是我们的 神; 我们是他草场的羊,是他手下的民。 惟愿你们今天听他的话:
8 मरीबा येथल्याप्रमाणे किंवा मस्साच्या दिवशी रानात केले तसे आपली मने कठीण करू नका,
你们不可硬着心,像当日在米利巴, 就是在旷野的玛撒。
9 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले, आणि जरी त्यांनी माझी कृती पाहिली होती, तरी माझ्या सहनशीलतेची परीक्षा केली.
那时,你们的祖宗试我探我, 并且观看我的作为。
10 १० चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो, आणि म्हणालो, हे बहकलेल्या मनाचे आहेत; त्यांनी माझे मार्ग जाणले नाहीत.
四十年之久,我厌烦那世代,说: 这是心里迷糊的百姓, 竟不晓得我的作为!
11 ११ म्हणून मी आपल्या रागात शपथ वाहिली की, हे माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.
所以,我在怒中起誓,说: 他们断不可进入我的安息!

< स्तोत्रसंहिता 95 >