< स्तोत्रसंहिता 94 >

1 हे परमेश्वरा, देवा तुझ्याकडे सूड घेणे आहे, तुझ्याकडे सूड घेणे आहे; तू हे देवा आपले तेज प्रगट कर.
耶和华啊,你是伸冤的 神; 伸冤的 神啊,求你发出光来!
2 पृथ्वीच्या न्यायाधीशा, ऊठ, गर्विष्ठांना त्यांचे उचित प्रतिफल दे.
审判世界的主啊,求你挺身而立, 使骄傲人受应得的报应!
3 हे परमेश्वरा, दुष्ट किती काळ, दुष्ट किती काळ विजयोत्सव करतील?
耶和华啊,恶人夸胜要到几时呢? 要到几时呢?
4 ते बडबड करतात आणि उर्मटपणे बोलतात आणि फुशारकी मारतात.
他们絮絮叨叨说傲慢的话; 一切作孽的人都自己夸张。
5 हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांस चिरडतात; जे तुझ्या मालकीचे राष्ट्र आहे त्यांना ते पीडितात.
耶和华啊,他们强压你的百姓, 苦害你的产业。
6 ते विधवांना आणि उपऱ्यांचा जीव घेतात, आणि ते अनाथांचा खून करतात.
他们杀死寡妇和寄居的, 又杀害孤儿。
7 ते म्हणतात की, परमेश्वर बघणार नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही.
他们说:耶和华必不看见; 雅各的 神必不思念。
8 अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?
你们民间的畜类人当思想; 你们愚顽人到几时才有智慧呢?
9 ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
造耳朵的,难道自己不听见吗? 造眼睛的,难道自己不看见吗?
10 १० जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
管教列邦的,就是叫人得知识的, 难道自己不惩治人吗?
11 ११ परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
耶和华知道人的意念是虚妄的。
12 १२ हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
耶和华啊,你所管教、 用律法所教训的人是有福的!
13 १३ दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
你使他在遭难的日子得享平安; 惟有恶人陷在所挖的坑中。
14 १४ कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
因为耶和华必不丢弃他的百姓, 也不离弃他的产业。
15 १५ कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
审判要转向公义; 心里正直的,必都随从。
16 १६ माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
谁肯为我起来攻击作恶的? 谁肯为我站起抵挡作孽的?
17 १७ जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
若不是耶和华帮助我, 我就住在寂静之中了。
18 १८ जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
我正说我失了脚, 耶和华啊,那时你的慈爱扶助我。
19 १९ जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
我心里多忧多疑, 你安慰我,就使我欢乐。
20 २० जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
那借着律例架弄残害、 在位上行奸恶的,岂能与你相交吗?
21 २१ ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
他们大家聚集攻击义人, 将无辜的人定为死罪。
22 २२ परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
但耶和华向来作了我的高台; 我的 神作了我投靠的磐石。
23 २३ त्याने त्यांचा अन्याय त्यांच्यावरच आणला आहे; आणि त्यांच्याच दुष्टपणात तो त्यांना नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यांना नाहीसे करील.
他叫他们的罪孽归到他们身上。 他们正在行恶之中,他要剪除他们; 耶和华—我们的 神要把他们剪除。

< स्तोत्रसंहिता 94 >