< स्तोत्रसंहिता 93 >

1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
יְהוָה מָלָךְ גֵּאוּת לָבֵשׁ לָבֵשׁ יְהוָה עֹז הִתְאַזָּר אַף־תִּכּוֹן תֵּבֵל בַּל־תִּמּֽוֹט׃
2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस.
נָכוֹן כִּסְאֲךָ מֵאָז מֵֽעוֹלָם אָֽתָּה׃
3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
נָשְׂאוּ נְהָרוֹת ׀ יְֽהוָה נָשְׂאוּ נְהָרוֹת קוֹלָם יִשְׂאוּ נְהָרוֹת דָּכְיָֽם׃
4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
מִקֹּלוֹת ׀ מַיִם רַבִּים אַדִּירִים מִשְׁבְּרֵי־יָם אַדִּיר בַּמָּרוֹם יְהוָֽה׃
5 तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
עֵֽדֹתֶיךָ ׀ נֶאֶמְנוּ מְאֹד לְבֵיתְךָ נַאֲוָה־קֹדֶשׁ יְהוָה לְאֹרֶךְ יָמִֽים׃

< स्तोत्रसंहिता 93 >