< स्तोत्रसंहिता 93 >
1 १ परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही.
耶和華作王! 他以威嚴為衣穿上; 耶和華以能力為衣,以能力束腰, 世界就堅定,不得動搖。
2 २ तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस.
你的寶座從太初立定; 你從亙古就有。
3 ३ हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात.
耶和華啊,大水揚起, 大水發聲,波浪澎湃。
4 ४ खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे.
耶和華在高處大有能力, 勝過諸水的響聲,洋海的大浪。
5 ५ तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.
耶和華啊,你的法度最的確; 你的殿永稱為聖,是合宜的。