< स्तोत्रसंहिता 92 >
1 १ शब्बाथ दिवसाचे स्तोत्र परमेश्वराची उपकारस्तुती करणे आणि हे परात्परा, तुझ्या नावाला स्तुती गाणे ही चांगली गोष्ट आहे.
安息日的詩歌。 至高者!最幸福的事情,是讚美上主,歌頌主名,
2 २ सकाळी तुझे वात्सल्य, आणि प्रत्येकरात्री तुझ्या सत्यतेबद्दल निवेदन करणे.
是清晨傳揚您的仁慈,是夜間宣講您的忠義,
3 ३ दहा तारांचे वाद्य, वीणेवर आणि सतारीवर संगीत वाजवणे चांगले आहे.
彈奏十絃琴和七絃琴,隨著琵琶旋律而詠詩。
4 ४ कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे. तुझ्या हातच्या कृत्यांविषयी मी आनंदाने गाईन.
上主,你既以你的化工使我喜悅,我就因你雙手的一切工程歡樂。
5 ५ हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.
上主,您的工程是多麼偉大,您的計劃是多麼奧妙!
6 ६ पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
無理性的人,不會明白這事;愚昧的人,也不會領悟這事。
7 ७ दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
歹徒雖然一時茂盛有如青草,作奸犯科的人雖然一時顯耀,然而他們終終必滅亡,永遠沉消,
8 ८ परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
上主,惟有您永遠是至尊至高。
9 ९ हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
上主,請看您的仇人,您的仇人必要沉淪;作惡的人無處棲身。
10 १० पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
您高舉我的角似野牛的角,用極新鮮的油膏傳抹了我,
11 ११ माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
因而我的眼目才輕視我的仇人,我耳朵歡樂聽見制服我的惡人。
12 १२ नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
正義的人像棕櫚茂盛,似黎巴嫩的香柏高聳。
13 १३ जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
他們被栽植在上主的殿中,在我們天主的庭院裏繁榮。
14 १४ वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
雖已年老,仍然結果,枝葉繁盛,依舊綠茂;
15 १५ हे यासाठी की, परमेश्वर सरळ आहे हे त्यांनी जाहीर करावे; तो माझा खडक आहे, आणि त्याच्याठायी काहीच अन्याय नाही.
為宣揚上主是多麼正直:我的磐石祂毫沒有不義。