< स्तोत्रसंहिता 91 >

1 जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
to dwell in/on/with secrecy Most High in/on/with shadow Almighty to lodge
2 मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
to say to/for LORD refuge my and fortress my God my to trust in/on/with him
3 कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
for he/she/it to rescue you from snare fowler from pestilence desire
4 तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
in/on/with pinion his to cover to/for you and underneath: under wing his to seek refuge shield and buckler truth: faithful his
5 रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
not to fear from dread night from arrow to fly by day
6 किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
from pestilence in/on/with darkness to go: walk from destruction to waste midday
7 तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
to fall: fall from side your thousand and myriad from right your to(wards) you not to approach: approach
8 तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
except in/on/with eye your to look and recompense wicked to see: see
9 कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
for you(m. s.) LORD refuge my Most High to set: make habitation your
10 १० तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
not to meet to(wards) you distress: evil and plague not to present: come in/on/with tent your
11 ११ कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
for messenger: angel his to command to/for you to/for to keep: guard you in/on/with all way: conduct your
12 १२ ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
upon palm to lift: raise you lest to strike in/on/with stone foot your
13 १३ तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
upon lion and cobra to tread to trample lion and serpent: snake
14 १४ तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.
for in/on/with me to desire and to escape him to exalt him for to know name my
15 १५ जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
to call: call to me and to answer him with him I in/on/with distress to rescue him and to honor: honour him
16 १६ मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.
length day to satisfy him and to see: see him in/on/with salvation my

< स्तोत्रसंहिता 91 >