< स्तोत्रसंहिता 91 >
1 १ जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.
He who dwells in the secret place of the Most High will rest in the shadow of Shaddai.
2 २ मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”
I will say of the LORD, "He is my refuge and my fortress; my God, in whom I trust."
3 ३ कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.
For he will deliver you from the snare of the fowler, and from the deadly pestilence.
4 ४ तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
He will cover you with his feathers. Under his wings you will take refuge. His truth is an encompassing shield.
5 ५ रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
You shall not be afraid of the terror by night, nor of the arrow that flies by day;
6 ६ किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
nor of the pestilence that walks in darkness, nor of the destruction that wastes at noonday.
7 ७ तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
A thousand may fall at your side, and ten thousand at your right hand; but it will not come near you.
8 ८ तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
You will only look with your eyes, and see the recompense of the wicked.
9 ९ कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
Because you have made the LORD, my refuge, the Most High, your dwelling place,
10 १० तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
no evil shall overtake you; no plague shall come near your dwelling.
11 ११ कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
For he will put his angels in charge of you, to guard you in all your ways.
12 १२ ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
In their hands they will lift you up, so that you will not strike your foot against a stone.
13 १३ तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
You will tread upon the lion and the viper. You will trample the young lion and the serpent underfoot.
14 १४ तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.
"Because he has set his love on me, therefore I will deliver him. I will set him on high, because he has known my name.
15 १५ जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.
He will call on me, and I will answer him. I will be with him in trouble. I will deliver him, and honor him.
16 १६ मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.
I will satisfy him with long life, and show him my salvation."