< स्तोत्रसंहिता 90 >
1 १ मोशेचे स्तोत्र हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
Lamo mar Musa ngʼat Nyasaye. Yaye Jehova Nyasaye, isebedo kar dak marwa nyaka nene e tienge duto.
2 २ पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
Kane pok gode obetie kata kane pok ichweyo piny gi ji modak e iye, to isebedo ka in Nyasaye nyaka nene kendo manyaka chiengʼ.
3 ३ तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
Idwoko dhano e lowo, kiwacho niya, “Doguru e lowo un koth dhano.”
4 ४ कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
Nimar higni alufu achiel e nyimi chalo gi odiechiengʼ manyoro mosekalo, kata gi sa mar otieno.
5 ५ पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
Iywoyo dhano ilalgo nono ka nindo mar tho terogi; gichalo gi lum mangʼich mar okinyi,
6 ६ सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
ma kata obedo ni loth ka ngʼich gokinyi to godhiambo to ner kendo two.
7 ७ खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
Mirimbi tiekowa kendo kecho mikechogo kodwa bwogowa.
8 ८ तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
Iseketo richowa e nyimi, ee, richowa ma watimo lingʼ-lingʼ ineno seche duto.
9 ९ तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
Ndalowa kadho piyo nikech mirimbi; hikwa rumo piyo gi chir.
10 १० आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु: ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
Ndalowa en piero abiriyo kata piero aboro, ka ringrewa otegno; to kata kamano ndalogo duto opongʼ gi chandruok kod kuyo, nimar gikalo piyo, kendo gilal nono.
11 ११ तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
En ngʼa mongʼeyo teko mar mirimbi? Nimar gero mari nigi teko machalo gi teko ma luori kelo.
12 १२ म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
Omiyo puonjwa kwano ndalowa kare, mondo wabed gi chuny mariek.
13 १३ हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
Ibiro siko kikecho nyaka karangʼo, yaye Jehova Nyasaye? Lokri, kech jatichni.
14 १४ तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
Romwa gokinyi gi herani ma ok rem, mondo wawer gi ilo kendo wabed mamor ndalowa duto.
15 १५ जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
Mi wabed mamor amingʼa mana kaka isemiyo waneno malit, marom gi higni ma wasenene chandruok.
16 १६ तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
Mad tijeni nere gi jotichni, mad duongʼni nyisre ne nyithindi.
17 १७ प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.
Mad ngʼwono mar Ruoth Nyasachwa obed kodwa; yie igurnwa tich mar lwetwa, ee gurnwa tich mar lwetwa.