< स्तोत्रसंहिता 87 >

1 परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.
לבני קרח מזמור שיר יסודתו בהררי קדש׃
2 याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास सियोनेचे द्वार अधिक प्रिय आहे.
אהב יהוה שערי ציון מכל משכנות יעקב׃
3 हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
נכבדות מדבר בך עיר האלהים סלה׃
4 राहाब आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन. पाहा, पलिष्टी, सोर व कूश म्हणतात त्यांचा जन्म तेथलाच.
אזכיר רהב ובבל לידעי הנה פלשת וצור עם כוש זה ילד שם׃
5 सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता; आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.
ולציון יאמר איש ואיש ילד בה והוא יכוננה עליון׃
6 लोकांची नोंदणी करताना, ह्याचा जन्म तेथलाच होता असे परमेश्वर लिहील.
יהוה יספר בכתוב עמים זה ילד שם סלה׃
7 गायन करणारे आणि वाद्ये वाजवणारेही म्हणतील की, माझ्या सर्व पाण्याचे झरे तुझ्यात आहेत.”
ושרים כחללים כל מעיני בך׃

< स्तोत्रसंहिता 87 >