< स्तोत्रसंहिता 85 >
1 १ कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
Para el director del coro. Un salmo de los descendientes de Coré Señor, le has mostrado tu bondad a la tierra; has restaurado la prosperidad de Jacob.
2 २ तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
Quitaste la culpa de tu pueblo; perdonaste todos sus pecados. (Selah)
3 ३ तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
Retiraste tu furia; y te alejaste de tu feroz ira.
4 ४ हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
Acércanos otra vez a ti, ¡Dios de nuestra salvación! Aleja tu ira de nosotros.
5 ५ सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
¿Vas a estar furioso con nosotros para siempre? ¿Permanecerás airado con todas nuestras generaciones futuras?
6 ६ तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
¿No restaurarás nuestras vidas, de tal modo que tu pueblo pueda hallar felicidad en ti?
7 ७ हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
¡Señor, muéstranos tu misericordioso amor! ¡Danos tu salvación!
8 ८ परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
Déjame escuchar la voluntad de Dios. Dios habla paz a su pueblo, a aquellos que confían en él. Pero ellos no deben volver por sus caminos necios.
9 ९ खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
Verdaderamente que la salvación de Dios está con los que hacen lo que él ordena. Su presencia gloriosa vivirá con nosotros en nuestra tierra.
10 १० दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
El amor y la verdad se encontrarán; la bondad y la paz se besarán mutuamente.
11 ११ पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
Lo que es verdad crecerá de la tierra; y lo que es justo se dejará ver desde los cielos.
12 १२ जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
Dios nos dará ciertamente todo lo que es bueno, y nuestra tierra producirá finos cultivos.
13 १३ त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
La verdad y la justicia saldrán de él para prepararle camino y que pueda pasar.