< स्तोत्रसंहिता 84 >
1 १ कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे सेनाधीश परमेश्वरा, तू जेथे राहतो ती जागा किती लावण्यपूर्ण आहे.
고라의 시, 영장으로 깃딧에 맞춘 노래 만군의 여호와여 주의 장막이 어찌 그리 사랑스러운지요
2 २ माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.
내 영혼이 여호와의 궁정을 사모하여 쇠약함이여 내 마음과 육체가 생존하시는 하나님께 부르짖나이다
3 ३ हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला आपले घर आणि निळवीला आपली पिल्ले ठेवण्यासाठी कोटे सापडले आहे.
나의 왕, 나의 하나님, 만군의 여호와여 주의 제단에서 참새도 제 집을 얻고 제비도 새끼 둘 보금자리를 얻었나이다
4 ४ जे तुझ्या घरात राहतात ते आशीर्वादित आहेत; ते निरंतर तुझी स्तुती करीत राहतील.
주의 집에 거하는 자가 복이 있나이다 저희가 항상 주를 찬송하리이다(셀라)
5 ५ ज्या मनुष्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे, ज्याच्या मनात सीयोनेचे राजमार्ग आहेत तो आशीर्वादित आहे.
주께 힘을 얻고 그 마음에 시온의 대로가 있는 자는 복이 있나이다
6 ६ शोकाच्या खोऱ्यातून जाताना, त्यांना पिण्याच्या पाण्याचे झरे सापडतात. आगोटीचा पाऊस त्यांना पाण्याच्या तलावाने झाकतो.
저희는 눈물 골짜기로 통행할 때에 그곳으로 많은 샘의 곳이 되게 하며 이른 비도 은택을 입히나이다
7 ७ ते सामर्थ्यापासून सामर्थ्यात जातात; त्यातील प्रत्येकजणाला सियोनेत देवाचे दर्शन लाभते.
저희는 힘을 얻고 더 얻어 나아가 시온에서 하나님 앞에 각기 나타나리이다
8 ८ हे सेनाधीश परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; याकोबाच्या देवा, मी जे सांगतो ते माझे ऐक.
만군의 하나님 여호와여 내 기도를 들으소서 야곱의 하나님이여 귀를 기울이소서(셀라)
9 ९ हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.
우리 방패이신 하나님이여 주의 기름 부으신 자의 얼굴을 살펴 보옵소서
10 १० तुझ्या अंगणातला एक दिवस इतर ठिकाणातल्या हजार दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे हे मला चांगले आहे.
주의 궁정에서 한 날이 다른 곳에서 천 날보다 나은즉 악인의 장막에 거함보다 내 하나님 문지기로 있는 것이 좋사오니
11 ११ कारण परमेश्वर देव आमचा सूर्य आणि ढाल आहे; परमेश्वर अनुग्रह आणि गौरव देतो; जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.
여호와 하나님은 해요 방패시라 여호와께서 은혜와 영화를 주시며 정직히 행하는 자에게 좋은 것을 아끼지 아니하실 것임이니이다
12 १२ हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित आहे.
만군의 여호와여 주께 의지하는 자는 복이 있나이다