< स्तोत्रसंहिता 83 >

1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, गप्प राहू नकोस. हे देवा, आमच्याकडे दुर्लक्ष करू नको आणि स्वस्थ राहू नकोस.
神よもだしたまふなかれ神よものいはで寂靜たまふなかれ
2 पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत, आणि जे तुझा द्वेष करतात त्यांनी आपले डोके उंच केले आहे.
視よなんぢの仇はかしがきしき聲をあげ汝をにくむものは首をあげたり
3 ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात. आणि ते एकत्र मिळून तुझ्या आश्रितांविरूद्ध योजना करतात.
かれらはたくみなる謀略をもてなんぢの民にむかひ相共にはかりて汝のかくれたる者にむかふ
4 ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू. यानंतर इस्राएलाचे नावही आणखी आठवणित राहणार नाही.
かれらいひたりき 來かれらを斷滅してふたたび國をたつることを得ざらしめイスラエルの名をふたたび人にしられざらしめんと
5 त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे, ते तुझ्याविरूद्ध करार करतात.
かれらは心を一つにしてともにはかり互にちかひをなしてなんぢに逆ふ
6 ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,
こはエドムの幕屋にすめる人イシマエル人モアブ、ハガル人
7 गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.
ゲバル、アンモン、アマレク、ペリシテおよびツロの民などなり
8 अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे; ते लोटाच्या वंशजांना मदत करीत आहेत.
アッスリヤも亦かれらにくみせり 斯てロトの子輩のたすけをなせり (セラ)
9 तू जसे मिद्यानाला, सीसरा व याबीन यांना किशोन नदीजवळ केलेस तसेच तू त्यांना कर.
なんぢ曩にミデアンになしたまへる如くキションの河にてシセラとヤビンとに作たまへるごとく彼等にもなしたまへ
10 १० ते एन-दोर येथे नष्ट झाले, आणि ते भूमीला खत झाले.
かれらはエンドルにてほろび地のために肥料となれり
11 ११ तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर, जेबह व सलमुन्ना यांच्यासारखे त्यांच्या सर्व सरदारांचे कर.
かれらの貴人をオレブ、ゼエブのごとくそのもろもろの侯をゼバ、ザルムンナのごとくなしたまへ
12 १२ ते म्हणाले, देवाची निवासस्थाने आपण आपल्या ताब्यात घेऊ.
かれらはいへり われら神の草苑をえてわが有とすべしと
13 १३ हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे, वाऱ्यापुढील भुसासारखे तू त्यांना कर.
わが神よかれらをまきあげらるる塵のごとく風のまへの藁のごとくならしめたまへ
14 १४ अग्नी जसा वनाला जाळतो, व ज्वाला जशी डोंगराला पेटवते.
林をやく火のごとく山をもやす熖のごとく
15 १५ तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर, आणि आपल्या तुफानाने त्यांना घाबरून सोड.
なんぢの暴風をもてかれらを追ひなんぢの旋風をもてかれらを怖れしめたまへ
16 १६ हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर यासाठी की, त्यांनी तुझ्या नावाचा शोध करावा.
かれらの面に恥をみたしめたまへ ヱホバよ然ばかれらなんぢの名をもとめん
17 १७ ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत; ते लज्जित होऊन नष्ट होवोत.
かれらをとこしへに恥おそれしめ惶てまどひて亡びうせしめたまへ
18 १८ नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.
然ばかれらはヱホバてふ名をもちたまふ汝のみ全地をしろしめす至上者なることを知るべし

< स्तोत्रसंहिता 83 >