< स्तोत्रसंहिता 82 >

1 आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.
Psalm Asafu. Bog biva v zboru Boga mogočnega, med oblastvi sodi.
2 कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
Doklej bodete sodili krivično, in potezali se za hudobne?
3 गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
Sodite za ubozega in siroto; nesrečnega in siromaka opravičite.
4 त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
Oprostite ubozega in potrebnega, iz roke krivičnih rešite.
5 “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
Ne vedó in ne pazijo, v temi hodijo neprestano; majó se vsi strebri zemlje.
6 मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
Jaz pravim: "Bogovi ste, in najvišjega sinovi vi vsi:
7 तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
Todà, umrli bodete kakor navaden človek; tudi kakor kateri iz med ónih poglavarjev bodete padli."
8 हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
Vstani, o Bog, sodi zemljo; ti namreč imaš posest med vsemi narodi.

< स्तोत्रसंहिता 82 >