< स्तोत्रसंहिता 82 >
1 १ आसाफाचे स्तोत्र देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.
Een psalm van Asaf. God staat in de vergadering Godes; Hij oordeelt in het midden der goden;
2 २ कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?
Hoe lang zult gijlieden onrecht oordelen, en het aangezicht der goddelozen aannemen? (Sela)
3 ३ गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.
Doet recht den arme en den wees; rechtvaardigt den verdrukte en den arme.
4 ४ त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
Verlost den arme en den behoeftige, rukt hem uit der goddelozen hand.
5 ५ “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”
Zij weten niet, en verstaan niet; zij wandelen steeds in duisternis; dies wankelen alle fondamenten der aarde.
6 ६ मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”
Ik heb wel gezegd: Gij zijt goden; en gij zijt allen kinderen des Allerhoogsten;
7 ७ तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.
Nochtans zult gij sterven als een mens; en als een van de vorsten zult gij vallen.
8 ८ हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.
Sta op, o God! oordeel het aardrijk, want Gij bezit alle natien.