< स्तोत्रसंहिता 81 >

1 आसाफाचे स्तोत्र देव जो आमचे सामर्थ्य, त्यास मोठ्याने गा; याकोबाच्या देवाचा आनंदाने जयजयकार करा.
برای سالار مغنیان برجتیت. مزمور آساف ترنم نمایید برای خدایی که قوت ماست. برای خدای یعقوب آوازشادمانی دهید!۱
2 गाणे गा आणि डफ वाजवा, मंजुळ वीणा व सतार वाजवा.
سرود را بلند کنید و دف رابیاورید و بربط دلنواز را با رباب!۲
3 नव चंद्रदर्शनाला, पौर्णिमेस, आमच्या सणाच्या दिवसाची सुरवात होते त्या दिवशी एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा.
کرنا را بنوازیددر اول ماه، در ماه تمام و در روز عید ما.۳
4 कारण हा इस्राएलासाठी नियम आहे. हा याकोबाच्या देवाने दिलेला विधी आहे.
زیرا که این فریضه‌ای است در اسرائیل و حکمی ازخدای یعقوب.۴
5 जेव्हा तो मिसर देशाविरूद्ध गेला, तेव्हा त्याने योसेफामध्ये त्याने साक्षीसाठी हा नियम लावला. तेथे मला न समजणारी भाषा मी ऐकली.
این را شهادتی در یوسف تعیین فرمود، چون بر زمین مصر بیرون رفت، جایی که لغتی را که نفهمیده بودم شنیدم:۵
6 मी त्याच्या खांद्यावरचे ओझे काढून टाकले आहे; टोपली धरण्यापासून त्याचे हात मोकळे केले आहेत.
«دوش او را از بار سنگین آزاد ساختم ودستهای او از سبد رها شد.۶
7 तू संकटात असता आरोळी केली, आणि मी तुला मदत केली; मी तुला मेघगर्जनेच्या गुप्त स्थळातून उत्तर दिले; मी मरीबाच्या पाण्याजवळ तुमची परीक्षा घेतली.
در تنگی استدعانمودی و تو را خلاصی دادم. در ستر رعد، تو رااجابت کردم و تو را نزد آب مریبه امتحان نمودم.۷
8 अहो माझ्या लोकांनो, माझे ऐका, कारण मी तुम्हास सूचना देतो, हे इस्राएला जर तू मात्र माझे ऐकशील तर बरे होईल.
«ای قوم من بشنو و تو را تاکید می‌کنم. وای اسرائیل اگر به من گوش دهی.۸
9 तुझ्यामध्ये परके देव नसावेत; तू कोणत्याही परक्या देवाची उपासना करू नकोस.
در میان توخدای غیر نباشد و نزد خدای بیگانه سجده منما.۹
10 १० मीच तुझा देव परमेश्वर आहे, मीच तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तू आपले तोंड चांगले उघड आणि मी ते भरीन.
من یهوه خدای تو هستم که تو را از زمین مصربرآوردم. دهان خود را نیکو باز کن و آن را پرخواهم ساخت.۱۰
11 ११ परंतु माझ्या लोकांनी माझी वाणी ऐकली नाही; इस्राएलाने माझी आज्ञा पाळली नाही.
لیکن قوم من سخن مرانشنیدند و اسرائیل مرا ابا نمودند.۱۱
12 १२ म्हणून मी त्यांना त्यांच्या हटवादी मार्गाने वागू दिले, अशासाठी की जे त्यांच्या दृष्टीने योग्य आहे ते त्यांनी करावे.
پس ایشان را به سختی دلشان ترک کردم که به مشورتهای خود سلوک نمایند.۱۲
13 १३ अहा, जर माझे लोक माझे ऐकतील; अहा, जर माझे लोक माझ्या मार्गाने चालतील तर बरे होईल!
‌ای کاش که قوم من به من گوش می‌گرفتند و اسرائیل در طریقهای من سالک می‌بودند.۱۳
14 १४ मग मी त्यांच्या शत्रूंचा त्वरेने पराभव करीन आणि अत्याचार करणाऱ्याविरूद्ध आपला हात फिरवीन.
آنگاه دشمنان ایشان رابزودی به زیر می‌انداختم و دست خود رابرخصمان ایشان برمی گردانیدم.۱۴
15 १५ परमेश्वराचा द्वेष करणारे भितीने त्याच्यापुढे दबून जातील. ते सर्वकाळ अपमानीत राहतील.
آنانی که ازخداوند نفرت دارند بدو گردن می‌نهادند. اما زمان ایشان باقی می‌بود تا ابدالاباد.۱۵
16 १६ मी इस्राएलास उत्तम गहू खाण्यास देईन; मी तुला खडकातल्या मधाने तृप्त करीन.
ایشان را به نیکوترین گندم می‌پرورد؛ و تو را به عسل ازصخره سیر می‌کردم.»۱۶

< स्तोत्रसंहिता 81 >