< स्तोत्रसंहिता 8 >
1 १ मुख्य गायकासाठी; गित्तीथ सुरावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.
【人的尊威】 達味詩歌,交與槳官。調寄「加特」。 上主,我們的主!你的名號在普世何其美妼!你的尊榮在天上彰顯光耀。
2 २ तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.
由赤子乳兒的口中,你取得完美的讚頌;為使恨你的人受辱,為使仇敵有口無用。
3 ३ तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.
當我仰望你手指創造的穹蒼,和你在天上布置的星辰月亮,
4 ४ तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?
世人算什麼,你竟對他懷念不忘?人子算什麼,你竟對他眷顧周詳?
5 ५ तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.
竟使他稍微遜於天神,以尊貴光榮作他冠冕,
6 ६ तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.
令他統治你手的造化,將一切放在他的腳下:
7 ७ सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.
所有的羊和牛,與野外的走獸,
8 ८ आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.
天空的飛鳥和海裏的魚類,及種種游泳於海道的水族。
9 ९ हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!
上主,我們的主!你的名號在普世何其美妙!